पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ लो० टिळकांचे चरित्र भाग २ नव्हते तर केवळ अनुभववादीच होते. कारण कर्मधर्मसंयोगाने सरकाराने टिळ- कांवरील खटल्याची जी तयारी चालविली होती तिची परिपूर्तता होऊन समारं- भाच्या दिवशीच बरोबर सकाळी टिळकांवर बेळगाव व नगर येथील भाषणाबद्दल खटला भरून जामीन मागितल्याची नोटीस त्यांच्यावर बजावण्यात आली. आद- ल्या दिवशी याची गुणगुण निघाली होती. पण ती टिळकांच्या कानापुरतीच होती. काही व्याख्यानांची भाषांतरे होत आहेत असेहि कळले होते. पण खट- ल्यापर्यंत मजल येईल असा कोणाचाच अजमास नव्हता. अर्थात् रविवारी वा- ड्यात मित्रमंडळीच्या गर्दीत उत्सवसमारंभ सुरू असता पोलीस सुपरिडेन्डन्ट साहे- बांचे दर्शन म्हणजे तो एक आश्चर्यकारक व अशुभदर्शकप्रसंगच होय ! वास्तविक पोलिसानी खरे म्हटले तर त्या दिवशी ही नोटीस बजावण्याचे कारण नव्हते. मॅजिस्ट्रेटचे बोलावणे २८ तारखेचे होते. ता. २४ किंवा २५ रोजी नोटीस बजाविली असती तर त्यात काही बिघडण्यासारखे नव्हते. नोटीस शनिवारी तरी बजवावयाची किंवा सोमवारी तरी बजवावयाची हे सरळ होते. रविवारचा दिवस बोलून चालून सुट्टीचा. त्या दिवशी 'शात्राथ' मानून पोलिससाहेबानी विश्रांती घेतली असती तर त्याना कोणी नावहि ठेविले नसते. पण टिळकांच्या घरी हा एक चमत्कार लोकानी आरंभिला तेव्हा विरोधी बुद्धीने आपल्याहि एका चमत्का- राची भर त्यात घालून रंगाचा बेरंग करण्याची मौज पाहण्याची बुद्धी पोलीसाना झाली असावी. आता खराच अद्भूत रस अवतरावयाचा तर नोटिशी ऐवजी पकड़ वारंटच हवे होते. मग खरी बहार ! इकडे परगावचे पाहुणे जमलेले आहेत टिळक षष्ठाब्दीच्या अभिषेकाला बसले आहेत बाहेर चौघडा वाजत आहे कचे- रीत वर्गणीचे रुपये मोजून देण्याघेण्याची गर्दी उडाली आहे इतक्यात पोलिसानी वारंट घेऊन यावयाचे व टिळकांना कद नेसलेले उठवून पकडून घेऊन जाव- याचे! जुन्या काळची रीत जवळ जवळ अशीच होती. कारण खटला म्हणजे घाला आणि घाला हा जितका अवचित घातला जातो तितका तो घाला खरा. पण तसा प्रकार मुळातच यावेळी नव्हता. पकड वारंटाचे दोन खटले पूर्वी होऊन गेले होते. सक्तमजुरी काळे पाणी सगळे प्रकार होऊन गेले होते. टिळकांचे वय ६० वर्षांचे झाल्यामुळे आता त्याना खुनशी सरकार झाले तरी प्रत्यक्ष तुरुंगात घालील ही गोष्ट कल्पनातीत होती. कारण काही वयानंतर लष्करी नोकरीची जशी माफी तशीच या वयात टिळकांनी काहीहि केले असते तरी त्याना प्रत्यक्ष तुरं गात घालणे अशक्य होते. काळे पाण्यावरून परत येऊनहि फारसे दिवस झाले नव्हते अवधी दोनच वर्षे झाली होती. अशा रीतीने केवळ वयोमानानेहि पाहता काही काही बाबतीत टिळक माफीच्या सदरात येऊन पडले होते असे म्हणण्यास हरकत नाही. शिवाय सरकारच्या दृष्टीने झाले तरी टिळकानी येऊन जाऊन जो काय घोर गुन्हा केला तो होमरूल लीगच्या विषयावर चार दोन कभी अधिक ठासलेली कमी अधिक कडक कमी अधिक थट्टेची टीकात्मक व्याख्याने दिली.