पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ वाढदिवसाचा समारंभ २३ आपणास शेवटी एवढीच विनंति करीत आहे की मातृभूमीच्या या आव्हानाकडे लक्ष देऊन कोणताहि भेदभाव मनात न ठेवता आपण सर्व 'राष्ट्रदेव' होऊ या. येथे चढाओढ नाही मत्सर नाही मानापमान नाही व संकटाची भीति धरूनहि उपयोग नाही. कार्य सिद्धीस नेण्यास परमेश्वर समर्थ आहे. आपण जे काम करितो त्याचे फळ आज ना उद्या आजच्या नाही तर पुढच्या पिढीस मिळालेच पाहिजे ते निश्चित होय. म्हणून कशाचीहि अपेक्षा न धरता आपण सर्वांनीच या राष्ट्रीय उद्योगास लागले पाहिजे. ईश्वर करो आणि ही प्रेरणा आपल्या सर्वाच्या मनात जागृत होऊन माझ्या डोळ्यादेखत मला तिचे अल्प तरी फळ पाहावयास सांपडो एवढीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. " ही एक लक्ष रुपयांची वर्गणी इतक्या थोड्या मुदतीत व या कानाचे त्या कानाला न लागता कशी जमली याचे स्वकीयाना व परकीयानाहि आश्चर्य वाटले. पण योगायोगामुळे हा प्रकार अकल्पित व आश्चर्यकारक असाच घडला. केसरीत या वर्गणीसंबंधाने जे आंकडे प्रसिद्ध झाले त्यावरून ही गोष्ट अकल्पित म्हणण्यास हरकत नाही. कारण असला हा अनुभव पहिलाच होता. अहेराची मूळ कल्पना ३० जून रोजी रात्री निघाली आणि २३ जुलै रोजी रात्री ८७३३६ इतके रुपये प्रत्यक्ष वसूल झाले. पुण्याबाहेर जसजसे दूर जावे तसतशी वर्गणी जमविण्याला अवधी कमीच पडली. आणि कित्येकाना तर १८ जुलैचा केसरीचा अंक हाती पडल्यावर ही बातमी कळली असे त्यांची पत्रे व तारा यावरून समजून आले. कित्येक देणग्या तारेच्या मनिऑर्डरने आल्या. आलेली रक्कम दररोज बँकेत भर- ण्याची व्यवस्था केली होती व पहिली एक हजाराची रक्कम ता. ४ जुलै रोजी जमा करण्यात आली. शेवटल्या सहा दिवसांचा खजिनदारानी हिशेब सांगितला तो असाः ता. १८ पाच हजार ता. १९ दहा हजार ता. २० पाच हजार ता. २१ आठ हजार ता. २२ दोन हजार व ता. २३ सुमारे पन्नास हजार. रविवारी तर रुपये मोजून घेण्यास फुरसत नाही असा काही काळ गेला. बेरजा करण्याचे श्रम फुकट जात. कारण बेरीज करीत असताच कोठून तरी रक्कम येई. सभेत आंकडा जाहीर होत असता असताच जाहीर करणाराच्या हातात एकाने ७०० रुपयांचे पाकीट आणून दिले. पण सुख व दुःख ही परस्परानुबंधी व परस्परानुगामी असावी असाच ईश्वरी संकेत असतो. हस्तनक्षत्रातील पावसाप्रमाणे निम्मे आभाळ निर्मळ निळे भोर आणि निम्यात ढग बिजा व गडगडाट. पावसाच्या सरीतून ऊन पाहावे उन्हाच्या प्रकाशात पाऊस पाहावा. अशीच ईश्वरी संमिश्र योजना आहे. समारंभाच्या सभेत बोलणाऱ्या गृहस्थांच्या तोंडून आनंदाच्या वृत्तीला धीरवृत्तीचे स्वरूप देण्या सारखा टिळकांवरील संकटे व त्यांचे धैर्य याचा उल्लेख किंवा ध्वनी मधून मधून येत होता. तेव्हा हे लोक टिळकांचे सांत्वन करीत आहेत की अभिनंदन करीत आहेत ? असेहि अपरिचित मनुष्याला वाटले असते. पण हे लोक भविष्यवादी वा. पोतदारस फै. म. म.