पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ ८० लो० टिळकांचे चरित्र भाग २ मानपत्र व आहेर यापैकी मानपत्राचा स्वीकार करण्यास संकोच वाटत असला तरी औपचारिक रीतीने का होईना मी त्याचा स्वीकार करितो. पण आहे- राची गोष्ट तशी नाही. आज आपण मला दिलेली ही रक्कम घेऊन मी काय कर- णार हे मला कळत नाही. मला स्वतःसाठी ती नको आहे. आणि स्वतःसाठी म्हणून ही रक्कम मी घेणे मला वाजवीहि दिसत नाही. तेव्हा मी या रकमेचा ट्रस्टी या नात्याने कायदेशीर व मला योग्य वाटेल त्या राष्ट्रीय कामाकडे खर्च करण्याकरिता आपण ती माझ्या स्वाधीन करीत आहा अशाच भावनेने ती स्वीका- रतो. ती माझी नाही अर्थात् ती 'विश्वासाची ठेव' म्हणून माझ्या हवाली केली आहे असे मी समजतो आणि मी आपणास असे आश्वासन देतो की वरील रक- मेत माझे स्वतःचे काही तरी तुळशीपत्र घालून तिचा विनियोग करण्याचे आपण माझ्याकडे सोपविलेले काम माझ्याकडून होईल तितक्या कसोशीने व वर निर्दिष्ट केलेल्या प्रकारच्या कामाकडेच करीन. यासंबंधाचे कागदपत्र व नियम वगैरे पुढे करण्यात येतीलच. मी ज्या शर्तीवर ही रक्कम घेत आहे तिजमुळे आपली काहीशी निराशा होईल. पण अशा वेळी माझ्या मनाकडे लक्ष देऊन आपण मला माफी करावी अशी माझी आपणास विनंति आहे. " साठ वर्षे पुरी होऊन पुढच्या आयुष्वक्रमाकडे दृष्टि देऊ लागले म्हणजे मनुष्याचे मन साशंक झाल्याशिवाय राहत नाही. निदान माझे तरी तसे झाले आहे. मागील आयुष्यापैकी चांगल्या दिवसापेक्षा संकटाचेच दिवस अशा वेळी डोळ्यापुढे उभे राहतात; आणि शारीरिक शक्ति क्षीण होत चालल्यामुळे संकटा- तून पार पडण्याची उमेदहि थोडी कमी होत जाते. तथापि मला अशी आशा आहे की परीक्षेच्या या कठीण प्रसंगीहि पूर्वीप्रमाणेच आपली सहानुभूति मला मिळून माझ्या हातून जे काही थोडेबहुत लोककार्य झाले असेल त्यात भर घालण्या- पुरते धैर्य व आयुष्य परमेश्वरकृपेने मला लाभेल. कारण असल्या कामात संकटे ही यावयाचीच. आपण माझ्याविषयी मानपत्रात जे प्रशंसापर उद्वार काढले आहेत ते पाहून मला परगुणपरमाणून् पर्वतीकृत्य नित्यं निजहृदि विकसंतः संति संतः कियतः " या भर्तृहरीच्या वचनाची आठवण होते. त्या आपल्या उद्गारामुळे माझ्या मोठेपणापेक्षा आपली उदारवृत्ति अधिक व्यक्त होते असे मी समजतो. पण माझी आपणास येवढीच प्रार्थना आहे की माझ्यासारख्या माणसाने केलेल्या यःकश्चित् कामगिरीने आपण तृप्त होऊ नका. आज आपणा सर्वांपुढे जे राष्ट्र- कार्य आहे ते इतके मोठे इतके व्यापक आणि इतके जरूरीचे आहे की त्याला आपण सर्वांनी माझ्यापेक्षा कितीतरी पट अधिक निश्वयाने आणि स्फूर्तीने लागले पाहिजे. ते दिनावधीवर टाकून चालावयाचे नाही. आपली मातृभूमि आपणा सर्वास या उद्योगास लागण्याबद्दल आव्हान करीत आहे. आणि मला वाटत नाही की तिचे पुत्र या आव्हानाचा अव्हेर करतील ! तथापि माझे कर्तव्य म्हणून मी 2