पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० लो० टिळकांचे चरित्र भाग तील इतिहासांत आपण विशेष महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उत्पादक फर्ग्युसन कॉलेजातील प्रोफेसर नामांकित ग्रंथकार केसरी व मराठा पत्रांचे संपादक राष्ट्रीय सभेचे सभा- सद कायदेकौन्सिलचे सदस्य व राष्ट्रीय चळवळीचे आद्यप्रवर्तक इत्यादि नात्यानी आपण जी लोकसेवा केली ती अमूल्य आहे. त्याचप्रमाणे सदाचरण स्वार्थत्याग मनोधैर्य इत्यादि ठळक अशा नैतिक गुणानी आपण या राष्ट्रातील लोकाना केवळ आदर्शभूत झालेले आहा. "आपण अंगिकारलेले लोकसेवेचे व्रत खरोखर फार कठीण किंबहुना खडतर होते. आपणावर आलेल्या संकटांकडे मागे वळून पाहिले असता कोणाचीहि छाती दडपून जाईल; पण त्या सर्व संकटाना आपण नेटाने तोंड कसे दिले संकटनिवार- णार्थ दीर्घप्रयत्न करून आपण कित्येकातून सुयश मिळवून कसे उत्तीर्ण झाला व ज्या कित्येकातून सुटका होणे अशक्य झाले ती आपण शांत मनाने व धैर्याने कशी सोसली हे ध्यानात आणिले म्हणजे फार कौतुक वाटते. “आपल्या इकडील सुशिक्षित समाजातील व्यक्तींचे आयुदायमान दुर्दैवाने मोठे असत नाही. या गोष्टीच्या सामान्य कारणात वर दर्शविलेल्या विशेष कार- णांची भर पडलेली असल्यामुळे आपला ६१ वा जन्मदिवस उगवलेला पहावयास सापडला ही ईश्वराची स्वतः आपणावर व त्याचप्रमाणे महाराष्ट्रावरहि विशेष कृपा समजली पाहिजे. आणि त्याच्या कृपेने आपणास चिरायुरारोग्य लाभो आणि आपल्या हातून आणखीहि लोकसेवा घडो अशी आमची प्रार्थना आहे. " आपल्या ६१ व्या जन्मदिवशी आपले अभिनंदन आम्ही रिक्त हस्ताने कसे करावे ? आपण जन्मभर स्वार्थत्यागपूर्वक केलेली लोकसेवा लक्षात घेता आप- णास जितक्या किंमतीचा आहेर नजर करावा तितका वास्तविक थोडाच होणार आहे. तथापि 'फूल नाही तर फुलाची पाकळी' या न्यायाने आम्ही या मान- पत्रासोबत सादर केलेली लहानशी रक्कम आपण स्वीकारावी अशी आमची आग्रह- पूर्वक विनंति आहे. ही रक्कम अवघ्या दोनतीन आठवड्यात थोड्याशा व्यक्ती- कडून आत्मस्फूर्तीने जमलेली आहे. महाराष्ट्रातील पुष्कळ लोकाना या समा- रंभाची बातमी वेळेवर न मिळाल्यामुळे त्याना त्यात अंशभागी होता आले नाही. तथापि काही थोड्या लोकाकडून तरी योग्य वेळी उपक्रम होऊन आजचा दिवस साजरा झाला ही बातमी ऐकून त्याना समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. "राष्ट्राकरिता काम करणारे आपणासारखे लोक स्वार्थनिरपेक्ष असतात या- मुळे त्यांचे अनृणी होणे हे काम कठीण होऊन बसते. तथापि राष्ट्रानेहि स्वार्थ- त्यागपूर्वक राष्ट्रनायकांची सेवा करण्यास तयार होणे हे जे त्याचे कर्तव्य आहे ते त्याजकडून बजावले न जाईल तर त्याजवर कृतघ्नपणाचा दोष येईल, म्हणून आम्हास या दोषातून मुक्त करण्याकरिता तरी आपण या आहेराचा स्वीकार करावा अशी विनंति आहे. " आपले स्नेहांकित