पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ वाढदिवसाचा समारंभ १९ धीर आला. आणि शेवटच्या थोड्या दिवसात वर्गणीच्या कामाला जोर यावा म्हणून मग समारंभाच्या आधी ( समारंभ इंग्रजी तारखेप्रमाणे २३ जुलैला योजला होता) सुमारे सात दिवस अण्णासाहेब पटवर्धन दादासाहेब खापर्डे दादासाहेब करंदी- कर अण्णासाहेब नेने गंगाधरराव देशपांडे डॉ. मुंजे व शंकरराव देव इतक्यांच्या सहीने विनंतीपत्र काढून ते ता. १८ जुलैच्या केसरीत प्रसिद्ध केले. तथापि या जाहीरपत्रकातहि जमेल ती सर्व रक्कम एकत्र करून देण्याचे ठरविले आहे इत- केच मोघम लिहिले होते. एक लक्षाचा आकडा घातला नव्हता. वर काही वेळा- पूर्वी खाजगी स्वरूपाची चाललेली चळवळ म्हणून सांगितली ती हीच. व ती खाजगी रूपानेच का चालविण्यात आली हे सांगितलेच. या चळवळीच्या आगे- मागे जन्मास आलेली व तिच्याच बरोबर वाट चालू लागलेली सरकारी चळवळ म्हणजे टिळकांवर खटला करण्याची. तीहि गुप्तच चालणे स्वाभाविक होय. तिची कारणे सर्वांना ठाऊकच असतात. ठरल्याप्रमाणे ता. २३ रोजी हा समारंभ व्हावयाचा. त्याकरिता वर्गणी देणारे असोत वा नसोत बाहेर गावच्या टिळकांच्या शेकडो मित्रमंडळीना पत्रे पाठवून पुण्यास समारंभाला पाचारण केले होते. व त्याप्रमाणे लोक आदले दिव- सापासून येऊ लागले होते. ता. २३ रोजी सकाळी होमहवन रुद्राभिषेक वगैरे झाला. घरी धर्मविधी देवळातून अनुष्टाने या गोष्टीहि झाल्या. वेदपठन झाले. भिक्षादान व इस्पितळातील रोग्याना मदत व गावातील काही संस्थाना लहानसान देणग्या दिल्या गेल्या. रात्री कीर्तन झाले. मुख्य समारंभ सायंकाळी टिळकांच्या वा- ड्यात झाला. हजारो लोक जमले होते. पटांगण तर भरूनच गेले पण छापखान्याच्या पत्र्यावरहि लोक चढून बसले. मुंबईचे स्वयंसेवक मुद्दाम आले होते त्यानी सभेची व्यवस्था फार चांगली ठेविली होती. ठळक मित्रमंडळी शिवाय मनमोहनदास रामजी डॉ. चंदुलाल देसाई गोविंदजी वसनजी मलबारी मर्चंट वगैरे इतर लोकहि आले होते. सभेचे अध्यक्षस्थान अण्णासाहेब पटवर्धन यांच्याकडे देण्यात आले. नंतर ठिक- ठिकाणची अभिनंदनपर पत्रे तारा यांची लांबलचक यादी वाचून झाल्यावर शिव- रामशास्त्री गोरे यानी संस्कृत मानपत्र अर्पण केले. बेळवी यानी इंग्रजी मानपत्र वाचून दाखविले. त्यानंतर डॉ. नरहर शिवराम परांजपे यानी मराठी मानपत्र वाचून दाखविले ते असे:- लो० बाळ गंगाधर टिळक ! “ईश्वरकृपेने आपणास ६० वर्षे संपून ६१ वे वर्ष लागले याबद्दल आपले अभिनंदन करण्यासाठी आम्ही आपली महाराष्ट्रातील ठिकठिकाणची मित्रमंडळी आज येथे जमलो आहो. आपली भेट झाल्याने आम्हाला अंतःकरणपूर्वक आनंद होत आहे. "महाराष्ट्राची गेली ३०/३५ वर्षे अत्यंत महत्त्वाची अशी असून या अवधी-