पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ लो० टिळकांचे चरित्र भाग २ स्वतः एक हजार रुपये देतो" असेहि त्याने सांगितले. या सूचनेमुळे सर्वच रंग बदलला. पुष्कळाना कल्पना पटली आणि उत्साहवर्धक वाटली. काही थोड्याना तिचे वैषम्यहि बाटले. आणि ही नसत्या भुर्दंडाची गोष्ट कशाला ? पैसा आहे कोठे ? व जमणार कसा ? अशी कुजबुज त्यांच्यात सुरू झाली. पण अशी माणसे थोडी व त्यातूनहि नुसती कानात कुजबुजणारी असल्याने इतरांचा विरस झाला नाही. आता ज्याना ही कल्पना आवडली त्यानाहि खन्या मनाने एक मोठी अडचण वाटली ती ही की समारंभाला अवघे तीन आठवडे उरले तेव्हा या लहानशा अवधीत ही गोष्ट पार पडणार कशी ? खाजगी रीतीने प्रयत्न करावा तर पत्रे मनुष्ये पाठवून किती पाठविणार ? शिवाय पुष्कळ लोक असे वगळले जाणार की त्यांची इच्छा असूनहि बातमी न कळल्यामुळे त्याना या कामी भाग घेता येणार नाही. बरे खाजगी रीतीने जमेल तितकी वर्गणी जमवून जी थोडी जमली तेवढी देऊन मग समारंभानंतर यादी व वसुली चालू ठेवणे यात स्वारस्य उरत नाही. याला मुदतबंदी व वेळेचे टिपण ही ओघानेच प्राप्त होतात. जो काय वार उडवावयाचा असेल तो त्या एकाच दिवशी उडाला पाहिजे. वर्गणीची ही कल्पना जाहीर केली तर काम अधिक सोपे जाईल आणि सर्व लोकाना ती गोष्ट कळेल. पण त्यातच अडचण ही की जाहीर मागणी करावयाची तर अंदाजी आकडा एक लक्षाचा म्हणून कळविला पाहिजे आणि तो जर जमला नाही तर तोंडची फुकट वाफ दवडली आणि आपले व टिळकांचे व्यर्थ हासे करून घेतले असे होणार. त्यापेक्षा काहीच न केलेले बरे. शेवटी अधिक विचार करता असे ठरले की एक लाख रुपये हाच इष्टांक धरावा. प्रथम पुणे शहरातील मित्रमंडळीनी आपले आकडे भरून आपल्या योग्यतेप्रमाणे वर्गणी जमवावी. आणि तो आकडा शोभेसा जमला म्हणजे मग इतर ठिकाणच्या मित्र- मंडळीना मागण्याला आधार व अधिकार आला. एकदमच जाहीर विनंती कर- ण्याची कल्पना नापसंत ठरली. आणि बसल्या बैठकीला शुभ प्रारंभ म्हणून किती वर्गणी जमते ते पाहावे आणि मग इतर गोष्टींचा विचार करावा. म्हणून लगेच यादी करण्याला सुरवात झाली. जागच्या जागी सुमारे सहा किंवा सात हजाराचे आकडे पडले. असे पाहून मंडळीनी ठरविले की आता आपण खाजगी रीतीनेच शहरात इतरां कडे व बाहेरगावीहि या कल्पनेची परिस्फुटता करून उद्योग करण्याला हरकत नाही. समजा लाखाऐवजी पन्नास हजार रुपयेच जमले तरी आयत्यावेळची म्हणून ही रक्कम देण्याला काही थोडी नाही. संकल्पाप्रमाणे एक लक्ष रुपये जमले तर उत्कृष्टच. आणि पंचवीस तीस हजार रुपये जमण्यालाहि कठीण आहे असे दिसले तर मग कल्पनाच टाकून द्यावी व आपल्या हातून होत नाही असे म्हणून समा- रंभाची इतर एखादी कल्पना अंमलात आणावी. पण दैवयोगाने या कल्पनेला क्षणाक्षणानी पुष्टीच मिळाली. लगेच दुसरे दिवसापासून पत्रे निरोप व मनुष्ये धाडण्यास सुरवात झाली. सुमारे पंधरा दिवसात मुंबई शहर बन्हाड नागपूर कर्नाटक या भागातून जी वर्तमाने आली त्यावरून कल्पना फुकट जात नाही असा