पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ वाढदिवसाचा सभारंभ १७ त्याग करावयाला तयार आहेत हेंच होय. टिळकांकरिता स्वार्थत्याग करावयाचा म्हणून आपल्या पायाने त्यांच्यावरोवर कोणी तुरुंगापर्यंत गेला आणि म्हणाला की त्यांच्याबरोबर मलाहि तुरुंगात ठेवा तर कोणी त्यास आंत घेणार नाही. त्यांच्या प्रेमाखातर व त्यांच्या प्रतिपक्षाच्या रागाखातर कोणी तामसी अत्याचाराला प्रवृत्त झाले असतील. पण ती गोष्ट सर्वसंमत होऊ शकत नाही. त्यांच्या तुरुंगवासात कित्येक लोकानी देवावर अभिषेक ठेवले. नैमित्तिक उपवास केले. आवडते पदार्थ खाण्याचे टाकले. जपाची अनुष्ठाने केली. या गोष्टी काही खोट्या नाहीत. पण सरकारापर्यंत त्याची वर्दी गेलेली नाही. करणारे त्या केवळ आपल्या समाधानाकरिता करीत. व काही लोक तर सात्विक भावनेने किंवा भीतीने त्या केल्या असे बाहेर कोणास कळूहि देत नसत. पण आता एक प्रसंग सहज असा आला म्हणून लोकाना त्यांच्याकरिता सर्वात सोपा नसला तरी सर्वात डोळ्यात अधिक भरणारा व सरकारची खात्री पटविणारा आणि आपल्या चळवळीच्या दृष्टीने उपयोगी पडणारा असा एक प्रकार मला सुचतो तो मी सुचवितो. तो कराल तर पाहा. आणि तो जर न कराल तर बाकीचे उपचार व समारंभ मी व्यर्थ समजेन." तेव्हा मंडळीने विचारले की असा प्रकार कोणता ? तेव्हा या गृहस्थाने सांगितले की "टिळकांच्या नावाने काही तरी इष्टांक म्हणून एक लक्ष रुपयांची थैली महाराष्ट्र-कर्नाटकात जमवावी आणि अहेर म्हणून ती या वाढदिव- साच्या समारंभात टिळकांना अर्पण करावी. हल्ली होमरूलची चळवळ टिळकानी सुरू केली आहे. विलायतच्या चळवळीचेहि ते बोलतात. व्याख्यानाचे दौरे वगैरे खर्चाच्या गोष्टी निघणारच. हा सर्व पैसा टिळक खाजगीतून म्हणजे अर्थात केस- रीच्या उत्पन्नातून आजवर करीत आले व वेळ पडल्यास ते या पुढेहि करतील. आपण होऊन ते कोणाकडे मदत मागणार नाहीत आणि मागितल्याशिवाय कोण कोणाला देणार? शिवाय आपल्या पक्षात अशा धनिक व्यक्ती कितीशा आहेत की जे झाकल्या मुठीने टिळकांना राष्ट्रीय कार्याला पैसे देतील? स्वराज्य- संघ काढला पण त्याची फी दोन रुपये व एक रुपाया. त्याचे सभासद जमणार किती व त्यांची वर्गणी येणार किती ? अशा संघाची वर्गणी म्हणजे गायीच्या आचळातून दूध काढावयाचे आणि तेहि आणखी दूध काढण्याकरिता तिच्या आचळाना लावूनच संपावयाचे. म्हणून तुम्ही आम्ही सर्व मिळून एक लक्ष रुपये जमवून जर या प्रसंगी टिळकाना देता आले तर ते चळवळीला उपयोगी पड- तील. अशी रक्कम आपल्या या दरिद्री प्रांतात कोणा एका मनुष्याकरिता आज- वर जमली नाही हे पाहून टिळकांची लोकोत्तरता व टिळकांकरिता खिशात हात घालून द्रव्य देण्याची बुद्धी ही सरकारला दिसून येईल, तसेच टिळकाना अनुया- यांचे पाठबळ आहे खरेच असे वाटून सरकारला थोडा वचकहि बसेल. आणि ही कल्पना आपण खऱ्या मनाने सुचवीत आहो हे लोकाना पटविण्याकरिता मी टि० उ... ७