पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ लो० टिळकांचे चरित्र भाग २ पाळणारा मनुष्य हा आचारहि पाळतो. आता या विधीचा समारंभ लहान किंवा मोठा होणे म्हणजे कमी किंवा अधिक खर्चाचा होणे हे त्या मनुष्याच्या योग्यते- बर ऐपतीवर व उत्साहावर अवलंबून असते. इतर धर्मातहि निरनिराळ्या काळी हे समारंभ करतात. रौप्य ज्युबिली सुवर्ण ज्युबिली रत्न ज्युबिली असे त्याचे क्रम मानलेले आहेत. म्हणजे मनुष्य व्यक्ति किंवा संस्था ही चाळीस वर्षे जगली म्हणजे तिची रौप्य ज्युबिली पन्नास वर्षे जगली म्हणजे सुवर्ण ज्युबिली आणि साठ वर्षे जगली म्हणजे रत्न ज्युबिली होते. युरोपियन लोक आपल्या लग्नाची अशा निरनिराळ्या प्रकारची ज्युबिली करीत असतात. अशा समारंभात व्यक्तीचा स्वतःचा तर आनंद असतोच पण इष्टमित्रांच्या सहानुभूतीने तो अनेकगुणित होतो. टिळक हे जरी जुन्या पद्धतीने श्रावणी व श्राद्धपक्ष हे विधि नियमाने करीत तरी अवांतर विधी व घरगुती समारंभ यांचा त्यांना कंटाळा असे. लग्नकार्या- शिवाय त्यांच्या घरी केव्हा वाद्ये वाजलेली कोणी ऐकिली नाहीत. गणेशउत्स- बात मात्र गणपतीपुढे चौघडा वाजे. या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी स्वतः होऊन आपल्या ६१ व्या वाढदिवसाचा समारंभ तर राहोच पण धार्मिक विधीहि केला असता की नाही कोणास ठाऊक ? आदल्या दिवशी घरी उपाध्या येऊन खण- पटीस बसता व भाचे धोंडोपंत हे त्या आग्रहाला दुजोरा देते तर “घे उरकून पण माझा वेळ मोडू नको ” इतके बोलून त्यांनी परवानगी दिली असती. पण टिळक ६० वर्षे जगले ही गोष्ट व्यक्तिशः त्यांनाच महत्वाची व भाग्याची होती असे नाही तर त्यांच्याहिपेक्षा इतरांना ती अधिक महत्वाची वाटत होती. टिळक मंडाले येथे तुरुंगात असताच कृष्णशास्त्री कवडे वगैरे काही मंडळीनी खाजगी रीतीने त्यांचा वार्षिक जन्मदिवस एखाद्याच्या घरी जवळची चार मित्रमंडळी बोलावून कर- ण्याचा प्रघात ठेविला होता. अर्थात त्यांना या ६१ व्या जन्मदिवसाचा समारंभ जाहीररीतीने करावा अशी कल्पना सुचली. सर्वांनाच ती सारखी पसंत होती. यामुळे त्या दिवसाच्या आधी सुमारे तीन आठवडे हा समारंभ कसा करावा याची योजना करण्याकरिता सार्वजनिक सभेत खाजगीरीतीने मंडळी बोलावण्यात आली. सुमारे ४०/५० लोक हजर होते. प्रश्न निघाला तेव्हा अनेकांनी अनेक प्रकार सुच- विले. ओला कोरडा दानधर्म मंत्रजागर पुराण-कीर्तन मेजवानी सभा मान- पत्र अहेर व रात्रौ शहरातील निरनिराळ्या देवळांतून दीपोत्सव इतके प्रकार सुच- विले गेले. यातले काही अखेर स्वीकारण्यात आले असते. पण तेथे एका गृह- स्थाने असा प्रश्न उपस्थित केला की असल्या साध्या गोष्टी करण्यात विशेष स्वारस्य ते काय ? “हा समारंभ खाजगी अभिनंदनापेक्षा सार्वजनिक अभिनंदनाचाच अधिक आहे. शिवाय सरकारात रीतीप्रमाणे पोलिसाकडून त्याचा रिपोर्ट जाईल आणि जाहीर सभा भरवून फार तर एखादे शेलापागोटे व रुप्याच्या करंड्यात मानपत्र दिले इतकेच सरकारच्या कानावर जाईल. पण या प्रसंगी लोक टिळकांना खरोखर किती प्रेमाने मानतात याचे खरे गमक त्यांच्याकरिता ते काय स्वार्थ-