पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ होमरूलची चळवळ व दडपशाही १५ काय ? ईश्वर विष निर्माण करतो त्याबरोबरच त्याचा उताराहि निर्माण करून ठेवतो अशी समजूत आहे. त्याप्रमाणे प्रेस अॅक्टातील पहिली जामीनकी मागण्या- च्या हुकुमाच्या विषाला ते सौम्य म्हणून उतारा ठेवला नसला तरी ती जामीनकी रद्द करण्याच्या जालीम विषावर उतारा ठेवला आहे असे त्यावेळी सरकारतर्फे सांग- ण्यात आले होते. पण गफलत होऊन शेवटी असे आढळले की विषमात्र अवतरले आणि त्याच्याबरोबर जो उतारा म्हणून पाठविण्यांत आला तो ईश्वरी पोस्टात कोठे गडप झाला. किंवा खाली येऊन पोचला असला तरी त्याच्यात विष उत्तर- विण्याचा गुण नाही असे अनुभवाला आले. यानंतर एकच गोष्ट बेझन्टबाईविरुद्ध करण्याची राहिली होती ती म्हणजे डिफेन्स अॅक्टाप्रमाणे त्याना एका जागी डांबून ठेवणे. पण त्या गोष्टीला अद्यापि थोडा अवकाश होता. (६) वाढदिवसाचा सभारंभ बाईची ही हकीकत झाली. आता टिळकांसंबंधाने पाहू. टिळक बेळ- गाव परिषदेहून सातारा येथील सत्कार घेऊन पुण्यास आले व नंतर उन्हाळ्यात नेहमीप्रमाणे सिंहगडास जाऊन थंड हवेकरिता काही दिवस राहिले. खापर्डेहि सिंहगडासच होते. दोघे मिळून जूनमध्ये खाली आले व दोघानीहि शिवाजी- उत्सवात भाग घेतला. नंतर महिना पंधरा दिवस थोडी स्वस्थता होती तीत टिळकानी केसरीत काही लेख लिहिले. याशिवाय गीतारहस्यासंबंधी वादविवाद चालूच होते. याच सुमारास टिळकांच्या संबंधाचे खरे लोकमत व्यक्त करणारी एक चळवळ आणि त्याच्याचबरोबर टिळकाना पायबंद घालून त्याना न्यायकोर्टात खेचणारी सरकारी चळवळ अशा दोन्ही एकदम सुरू झाल्या. आणि एकीची समाप्ति ज्या दिवशी त्याच दिवशी दुसरीचे स्वरूप प्रगट झाले. पहिली चळवळ टिळकांचा ६१ वा वाढदिवस मोठ्या थाटाने साजरा करण्याची आणि दुसरी त्यांच्यावरील तिसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याची. दोन्ही चळवळी प्रथम गुप्त स्वरू- पातच चालू होत्या. सरकारची चळवळ गुप्त रूपाने चालावयाची हे ठीकच होते. पण दुसरी चळवळ गुप्तपणे चालण्यालाहि विशेष कारण होते व ते काय हे खालील हकीगतीवरून कळून येईल. सन १९१६ सालची आषाढ व० ६ म्हणजे ता. २० जुलै या दिवशी टिळकांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण होत होती. अर्थात त्यांचा ६१ वा वाढदिवस हा विशेष महत्त्वाचा असा त्यांच्या इष्टमित्रानी मानल्यास नवल नाही. सामान्यतः कोणाच्याहि वयाची ६० वर्षे पुरी होणे हे एका दृष्टीने त्याचे भाग्यच समजतात. इतर गोष्टी सोडून दिल्या तरी नुसते आयुष्य लाभणे हे देखील चांगल्या नशि- बाचेच लक्षण असते. षष्ठाब्दि हा एक हिंदुधर्मात धार्मिक विधी मानिला असून इतर संस्कारसमारंभाप्रमाणे ६१ व्या वाढदिवशी होमहवन अन्नसंतर्पण वगैरे धर्माचार पाळावे असे शास्त्रात सांगितले आहे. सामान्यत: इतर धार्मिक आचार