पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ लो० टिळकांचे चरित्र भाग २ गाडीच्या गतीमुळे चालती राहते. आणि पुढे दुसरा दमला तर त्याने आपले पाय हालविण्याचे बंद ठेवावे, पहिल्याच्या खांद्यावर हात टेकावा आणि पहिल्या स्नेह्याने पाय मारण्यास सुरुवात करावी. दोघानीहि एकदम पाय मारले तर दोन्ही गाड्या अधिक वेगाने चालू लागतील. आणि एकाचे पाय थांबले तरी दुसऱ्याच्या शक्तीने दोन्ही गाड्या थोड्या कमी वेगाने पण चालूच राहतील. या योजनेत फार मार्मि- कपणा होता. आणि त्याप्रमाणे बाई व काँग्रेस यांच्या संस्थांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेच होते. अर्थात काँग्रेसचे पाय थांबले तर लीगचे पाय जोराने मारून दोन्ही गाड्या पुढे चालवू असे वाईना वाटे. तिसरा ठराव पुढे मांडला त्यांत असे होते की, टिळकांच्या संघाचे व बाईच्या संघाचे उद्देश एकच असल्यामुळे उभयतांचे सहकारित्व असावे. दोघानीहि आपापल्या परीने पण एकच काम करावे. शेवटी बाई भाषण करताना म्हणाल्या 'आत्माहुतीची ज्वाला स्वर्गापर्यंत पोचल्याशिवाय दैवी अशिर्वाद खाली उतरत नसतो. ' आपल्या पत्राची पहिली जामिनकी रद्द करणाऱ्या हुकुमाविरुद्ध बाईनी हायको- किडे अपील दाखल केले. त्याची सुनावणी चीफ जस्टिस व न्या. आयलिंग आणि शेषगिरी अय्यर याजपुढे ४ सप्टेंबर अखेर झाली. सरकारतर्फे अॅडव्होकेट जनरल श्रीनिवास अय्यंगार हे काम चालवीत होते. बाईतर्फे स्वतः बाईच काम · चालवीत होत्या व त्याना गोविंदराज मुदलीयार व दादासाहेब करंदीकर हे मदत करीत होते. या सुनावणीत काही मनोरंजक भाषणे व प्रश्नोत्तरे झाली. पण ती विस्तारभयास्तव आम्ही देत नाही. या अपिलावरोबर दुसराहि एक अर्ज वाईनी केला होता. तो चार्टर आक्टाप्रमाणे होता. त्यातील काम सी. पी. रामस्वामी अय्यर हे चालवीत होते. पहिले अपील हे प्रेस अॅक्टाप्रमाणे होते व त्या कायद्याच्या शब्दावरूनच त्याचा निकाल व्हावयाचा होता. पण 'कॉमरेड ' पत्राच्या जा- मिनकीच्या अपिलात सर लॉरेन्स जेन्किन्स यानी ठरविल्याप्रमाणे जर कायद्याचे शब्द व्यापक असून त्यांतून बचाव नाही असे ठरेल तर प्रेस अॅक्ट हाच मुळी चार्टर अॅक्टाविरुद्ध आहे, म्हणजे प्रेस अॅक्ट हा बेकायदेशीर आहे असे ठरवून घेण्या- करिता हा दुसरा अर्ज केला होता. प्रेस अॅक्टाप्रमाणे आपल्याला जो अधिकार नाही असे हायकोर्टाचे म्हणणे असे तो अधिकार त्याना आहे असे प्रस्थापित कर- ण्याच्या हेतूने हा दुसरा अर्ज दिला होता. पण अखेर दोन्ही अर्जातील निकाल बाईच्या विरुद्ध झाला. पण तो निकाल देताना सर लॉरेन्स जेन्किन्स यांजप्रमाणे मद्रासच्या न्यायमूर्तीनीहि ' हा कायदा वाईट आहे, पण त्याला आमचा इलाज 'नाही' असे खेदोद्गार काढले. देशाच्या कोठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात अत्याचार होत होते याचे निमित्त घेऊन प्रेस अॅक्ट केला. आणि तोच आता अत्याचार थांबले तरी सामान्य व कायदेशीर राजकीय चळवळीलाहि लागू लागला हे पाहून ना. मुधोळकर वगैरे लोक आपण त्याच्या मंजुरीला संमति दिली याविषयी पश्चा- ताप पावून उघडपणे टीका करू लागले. पण त्या पश्चात्तापाचा आता उपयोग