पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ होमरूलची चळवळ व दडपशाही १३ युद्धात हिंदुस्थानचा प्रत्यक्ष संबंध आला त्याने तसा परिणाम न व्हावा अशी अपेक्षा करण्यात सरकारची चूक आहे. युद्ध चालू असता भावी योजनेच्या गोष्टी कोणी बोलू नयेत हे म्हणणे फुकट आहे. युद्ध झाले म्हणूनच सरकारने आपले धोरण बदलले पाहिजे ! पण सरकार अशा उपदेशाला थोडीच दाद देणार ! सप्टेंबर महिन्यात म्हणजे पहिला जामीन घेतल्यापासून तीन महिन्याच्या आंत 'न्यू इंडिया'कडून घेतलेल्या पहिल्या जामिनाची रक्कम मद्रास सरकारने जप्त केली. 'कॉमनवील' पत्राकडूनहि पाच हजारांचा जामीन मागितला. अशा रीतीने पंधरा- हजार रुपयांची जामीनकी भरण्याचा प्रसंग ब्रेझन्टबाईवर आला. व याला बरोबर प्रतिक्रिया म्हणून लखनौ येथे भरणाऱ्या काँग्रेसच्या स्वागतमंडळाने बाईचेच नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुचविले. बाईनी मद्रासेपुरता स्वराज्यसंघ पूर्वीच काढला होता. पण १९१५ च्या डिसेंबरात काँग्रेसच्या पूर्वी मुंबईस खाजगी सभा भरली तीत त्यानी असे आश्वासन दिले होते की, होमरूलच्या चळवळीचे कार्य स्वतः काँग्रेस कोणत्या ना कोणत्या रूपाने करील तर मी आपल्या संघाचा फैलाव हिंदुस्थानात करणार नाही. पण त्या बाजूने निराशा झाल्यामुळे वचनमुक्त होऊन ता. २७ ऑगस्ट रोजी बाईनी जाहीरनामा काढला की, ता. १ सप्टेंबरपासून सर्वत्र माझ्या अनुयायानी लीगच्या शाखा काढाव्या. ता. ३ सप्टेंबर रोजी मद्रा- सेस सभा भरली त्यात असे जाहीर करण्यात आले की स्वराज्यसंघ ही संस्था आह्मी आता निश्चितपणे काढली. सी. पी. रामस्वामी अय्यर यानी असा ठराव मांडला की, आपला संघ मद्रासेतील प्रा. कॉ. कमिटीला जोडून घेतला जावा. बाईचे धोरण काँग्रेसला धरूनच लीगचे काम चालवावे असे प्रथमपासून सुसंगत होते. तेच अजून कायम होते व त्याप्रमाणेच ही योजना होती आणि ती योग्यच होती. मुंबईच्या कॉंग्रेसमध्ये असा ठराव होऊन राहिला होता की ज्या जुन्या अगर नव्या संस्था काँग्रेसच्या पटात आपले नाव नोंदवून घेण्याचा अर्ज करतील त्यांना काँ. कमिट्यानी अवश्य नोंदवून घेतलेच पाहिजे, आणि नोंदलेल्या एखाद्या संस्थेला पटावरून काढून टाकावे असे ऑ. इं. कॉ. कमिटीला वाटेल तर विशेष कारण दाखवून तसे करण्याला फक्त त्याच कमिटीला अधिकार राहील. मद्रासची काँग्रेस कमिटी बाईंना अनुकूल होतीच. पण कँग्रेसच्या घटनेचाहि असा आधार होता. यामुळे होमरूल लीगचे सोवळेभांडे अशा रीतीने अचानक काँग्रेसच्या दारातून आत पडले. नेमस्त लोकाना टिळक ब्रेझन्ट बाई सारख्या उपद्व्यापी लोकाना काँग्रेसपासून दूर हात दोन हातावर ठेवावे असे नेहमी वाटत होते. पण या घटने- मुळे त्यांचाहि इलाज नाहीसा झाला. बाईची कल्पना कॉंग्रेसशी निकट संबंध ठेवण्या- ची मुळात अशा प्रकारची होती की, सायकलवर बसून जाणारे दोन स्नेही मिळून . रस्त्याने जाऊ लागले म्हणजे एक पाय मारीत असता दुसऱ्याने आपले पाय थांबवून सोबत्याच्या खांद्यावर नुसता हात ठेवला तरी त्याची गाडी दुसऱ्या