पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ होमरूलची चळवळ व दडपशाही ११ करावी असाहि ठराव झाला. तेथून लीगच्या कामाला रीतसर सुरवात झाली. ता. १ मे रोजी या संघाच्या विद्यमाने टिळकांचे पहिले व्याख्यान झाले. आणि यानंतर असा प्रघातच पडून गेला की जेथे जेथे मोठ्या महाराष्ट्रांत व कर्नाटकात जिल्हा तालुका सभा भरतील तेथे तेथे त्याच्याच बरोवर स्वराज्य संघातील लोकाचीहि सभा भरावी आणि सभासद वर्गण्या वगैरे मिळविण्याचे काम करावे. पुढील महिन्यात बेझेन्टवाई पुण्यास आल्या तेव्हा ता. २२ मे रोजी क्रीडा- भुवनात सार्वजनिक सभेमार्फत टिळक अध्यक्ष असता बाईंचे व्याख्यान करवि- ण्यात आले. त्यात त्यानी सागितले की लोखंड तापलेले असताच ते ठोकून घ्यावे असा उपदेश विलायतेतील मंत्रिमंडळापैकी बोनर लॉ यानी वसाहतीच्या लोकाना केला, तोच आपणालाहि समजून हिंदी लोकानी कार्य केले पाहिजे. टिळ- कानी सागितले की लहान सहान मागण्या करण्याचे दिवस गेले. म्हणून आता होमरूल मागण्यालाच आपण प्रारंभ केला पाहिजे. पण होमरूल लीगची चळवळ सुरू झालेली पाहताच अधिकारी जागे झाले आणि त्यानीहि उल्दी चळवळ सुरू केली. प्रेस - अॅक्टाप्रमाणे राष्ट्रीय पक्षाच्या काही वर्तमानपत्रांकडून यापूर्वीच जामीन घेण्यात आला होता. तो आता इतर पत्रांचा घेण्याला सुरवात झाली. नागपूर येथील 'महाराष्ट्र ' पत्राचा जामीन मागण्यात आला व त्यामुळे त्याचा एक अंकहि बंद पडला. ता. २२ मे रोजी इकडे पुण्यास बेझंटबाईचे व्याख्यान झाले त्याचदिवशी त्यांच्या 'न्यू- इंडिया' पत्राच्या छापखान्याचा जामीन घेण्याचा हुकूम निघाला. तो बाई ता. २६ रोजी मद्रासेस परत जाताच त्यांच्यावर बजाविण्यात आला. हुकुमात जामिनकी थोडी म्हणजे दोन हजारांची मागण्यात आली होती व ती भरण्याला दोन आठवड्यांची मुदतहि दिली होती. या हुकुमाविरुद्ध मद्रासेस चळवळ सुरू झाली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे ज्या स्वराज्ययोजनेचा विचार करण्याचे काम खुद्द काँग्रेसने सोपविले होते त्याचीच मागणी न्यूइंडिया पत्र करीत असता त्याकडून जामीन का घेण्यात आला ? अशी पृच्छा होमरूलच्या चळवळीत सामील नसलेल्या लोकानीहि सुरू केली. दोन हजार रुपये हे वाईच्या खिसगण- तीत नव्हते. पण मुंबईहून त्यांना तार गेली की जामीनाची रक्कम शिवाय पाचशे रुपये आह्मी तुम्हास मुंबईहून पाठवितो. सर सुब्रह्मण्य अय्यर मद्रास हायकोर्टचे एकवेळचे चीफ जस्टिस यानी प्रेस अॅक्टाच्या या धुमाकुळावर उघड टीका केली. सरकारने अशा रीतीने हात उचलला तरी चळवळीवर प्रत्यक्ष परिणाम काही झाला नाही. टिळक व बेझंटवाई यांची व्याख्याने अधिकाधिक सुरू झाली. मद्रासेकडे होमरूललीगचे जाळे अधिकाधिक पसरू लागले. 'न्यू इंडिया' पत्राकडे सहानुभूतीची व प्रतियोगी निषेधाची पत्रे इतकी जाऊ लागली की केसरीने लिहिल्याप्रमाणे त्यांची लांबी यार्डीनी मोजण्याची राहिली नसून ती फर्लांगानी मोजिली पाहिजे ! या जामिनकीचा व एकंदर सरकारी धोरणाचा इतर पक्षातील