पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० ० लो० टिळकांचे चरित्र भाग २ " ज्या दिवशी हा समेटाचा ठराव यावयाचा होता त्याचे आदले रात्री राष्ट्रीय पक्षातील कट्टरानी एक आपापसात सभा भरविली. मते घेणे चालले तेव्हा एक वृद्ध पुणेरी गृहस्थ मी विरोधी आहे या अर्थी 'I am opposite' असे ओर डला. तेव्हा हशा पिकला. अखेर मते मोजता समेटाच्या विरुद्ध बहुमत पडले. पण भरसभेत समक्ष टिळकाना विरोध करावा कोणी हे ठरेना. मांजराच्या गळ्यात घाट बांधावी हे खरे, पण कोणी बांधावी ? टिळकाना ही गोष्ट कळली तेव्हां दुसऱ्या दिवशी ठराव पुढे मांडताना टिळकानी प्रत्येकाला हडसून खडसून विचारले, आणि विरोध करावयाचा असेल तर 'आता पुढे या' असे म्हणून एके- काला पाचारण केले. पण त्यांच्या विरुद्ध जाण्याची कोणाचीहि छाती झाली नाही. आणि कोणी संक्षेपाने तर कोणी पाल्हाळाने समेटाला संमतीच दिली ! अशा रीतीने समेटाचे और्ध्वदेहिक करण्याला आलेली मंडळी त्याचा वाढदिवस साजरा करून गेली. " श्रीनिवास सेटलूर यानीहि आपल्या एका आठवणीत असेच लिहिले आहे. "गोखल्याच्या अखेरच्या दिवसात मी त्यांना भेटावयाला गेलो. तेव्हा ते मला म्हणाले बेझंटवाईच्या मार्फत समेटाच्या अटी मी भूपेंद्रनाथ बसू यांचेकडे पाठविल्या आहेत त्या पहा. टिळकांकडे जा. त्यांच्या पक्षात तुम्हाला मानतात. तरी त्या पक्षातील लोक त्या स्वीकारतील असे घडवून आणा पाहू! त्यानी अटी दाख- विल्या व त्या मी पाहिल्या. ते म्हणाले " या अटी सयुक्तिक आहेत की नाहीत ?" मी म्हणालो " या अटी सयुक्तिक आहेत व टिळक त्यातील कोणत्याहि अमान्य करणार नाहीत. " त्यावर गोखले म्हणाले " तुम्ही बोलला हे ऐकून मला फार बरे वाटले. माझी खात्री आहे की या अटी व बंधने स्वीकारूनहि थोड्याच वर्षात टिळक राष्ट्रीय सभा काबीज करतील. " नंतर थोडा वेळ विचार केल्यासारखे दाखवून गोखले म्हणाले " टिळकानी या अटी मान्य केल्या तर आम्हीहि त्या सर्व इमानाने पाळल्या पाहिजेत. कारण टिळकानी आपल्या बाजूला बहुमत मिळ- बिले तर देश त्यांच्या बाजूला आहे असाच त्याचा अर्थ होईल. " (५) होमरूलची चळवळ व दडपशाही स्वराज्यसंघ स्थापन करण्याचे दुसरे कार्य होते त्याकरिता ता. २८ एप्रिल रोजी बेळगावास संघाची सभा झाली. तीत प्रथमच असा ठराव झाला की, प्रांतिक परिषद व होमरूललीग यांचा अर्थाअर्थी कोणताहि संबंध नाही असे मानावे. पूर्वी डिसेंबर ता. २३, २४ रोजी पुण्यास जी पंधरा लोकाची कमिटी नेमली होती तिची बैठक होऊन लीगच्या सभासदांची नावे करण्याचे काम सुद्धा सुरू झाले. आणि बॅप्टिस्टा हे अध्यक्ष, केळकर हे चिटणीस, गोखले हे दुय्यम चिट- णीस, सभासदाची प्रवेश फी दोन रुपये, वार्षिक फी एक रुपया अशी घटना ठरून होमरूल बिल तयार करावे व विलायतेत लोकमत जागृत करण्याची खटपट