पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ समेटाचे शहाणपण परिस्थिति पाहता समेट होणे इष्ट आहे" हे जे शब्द ठरावात आल्याचे वर दिले आहे त्याचे स्वारस्य या वादावरून कळून येईल. (४) समेटाचे शहाणपण बेळगांवास चर्चा झाली तिच्याविषयी गंगाधरराव देशपांडे यानी आपल्या आठवणीत खालीलप्रमाणे लिहिले आहे. "बेळगावच्या परिषदेपूर्वीच समेटाची बाटा- घाट करण्याकरितां टिळकानी काही मंडळीना पुण्यास बोलाविले होते. वाड्यांत सकाळपासून वाटाघाट चालू होती. वाद जोरात चालला. टिळक काही वेळ वादांत भाग घेत व काही वेळ उठून आपल्या माडीवर जाऊन बसत. मला वादाचा कंटाळा आला म्हणून मी त्यांच्या माडीवर जाऊन विचारले, विनाकारण काय्या- कूट का ? आपल्या मनांत काय आहे ते स्पष्ट सांगा. असल्या प्रसंगी माझ्या समजुतीप्रमाणे आमची वैयक्तिक मते बाजूला सारून आपल्याच बुद्धीला शरण जाणे योग्य आहे. अशा वेळी पुढाऱ्याचे मत हेच तत्त्व असे समजणाऱ्यापैकी मी आहे. टिळक म्हणाले, 'सर्वानाच असे कोठे वाटते ? म्हणून खल झालेला बरा. पण माझ्या मनात क्रीडवर सही करून कॉंग्रेसमध्ये जावे असे आहे. काँग्रेसच्या बाहेर राहून काही एक काम झाले नाही.' मी त्याना इतकेच सांगितले की, बेळगांव जिल्ह्याचे मत तुमच्याच बाजूचे आहे असे समजा. बाकी तुम्ही सांभाळा. यावरून टिळ काना आपल्या पक्षातील काही लोकाची समजूत घालण्याला किती जिकीर पडली असेल हे दिसून येईल. " बेळगाव परिषदेत स्वीकारलेल्या धोरणा संबंधाने गंगाधरराव देशपाडे यांचा अनुभव वर दिलाच आहे. पण डॉ. मुंजे यानी या बाबतीत अधिक खुला- सेवार लिहिले आहे. ते लिहितात की “फ्रीडवर सही करून काँग्रेसमध्ये शिरणे ही गोष्ट माझ्या बुद्धीला मुळीच पटत नाही आणि परशुरामाचा व श्रीकृष्णाचा परा- भव त्यांचा अवतार संपल्यामुळे जसा झाला तसा काँग्रेसमध्ये तुम्ही शिरल्याने तुमचा होणार असे मी जवळ जवळ स्पष्टपणे टिळकांना सांगितले. तरी पण मी असेच म्हणालो की तुम्ही माझ्यापेक्षा अनंत पटीने शहाणे आहा आणि तुमच्या शहाणपणावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. अर्थात ही श्रद्धेच्या परिक्षेची वेळ आहे म्हणून मी तुमच्या विरुद्ध जाणार नाही. अकल्याण व्हावयाचे असेल तर तुमची आज्ञा पाळून होवो. पण तुम्ही मात्र ही चूक करीत आहा. तेव्हा टिळक मला म्हणाले ' यावेळेस हेच करणे शहाणपणाचे आहे हे तुमच्या लवकरच प्रत्य- याला येईल. ' तिसऱ्या दिवशी टाइम्सने असे लिहिले की, समेटाच्या ठरावाने टिळकानी काँग्रेस काबीज केली. तेव्हा माझे डोळे उघडले. " बेळगाव येथील समेटाच्या वादाविषयी गंगाधरराव देशपांडे व डॉ. मुंजे यांच्याप्रमाणेच डॉ. भट यानीहि आपली आठवण सांगितली आहे. ते लिहितात टि. उ... ६