पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ लो० टिळकांचे चरित्र भाग २ या कामी ती उपयोगात आणली नाही. कारण एक तर प्लँचेट मृत आत्म्याशीच बोलू शकते करंकी आत्मा निर्जीव आणि प्लँचेटची फळीहि निर्जीव ती जिवंत- मनुष्याच्या आत्म्याशी कशी बोलेल ? ' सर्वः सगंधेषु विश्वसति' असे कवीने म्हटले आहे. विषमात होणारा तो व्यवहार नव्हे. बरे एखाद्याचे प्लँचेट चाललेच असते तर टिळक सुटून आल्यानंतर त्याला खोटे ठरविण्याचा संभव म्हणून त्या भानगडीत कोण कशाला पडेल ? पण समेटाला विरोध करणाऱ्या काही लोकानी "हो हो टिळक आज समेटाला विरुद्ध आहेत असे आम्ही सांगतो " असे आत्मविश्वासाने सांगितले. पूर्वी सांगितल्याप्रमाणे साताऱ्यासहि तो ठराव झालाच होता पण आता विरोधी लोकावर मोठीच बाजू कोसळली. कारण स्वतः टिळक मूर्तिमंत उभे राहून म्हणू लागले की समेट करणे अवश्य आहे तेव्हा त्याना मोठेच कोडे येऊन पडले. पण तत्त्वापुढे टिळकांनाहि आम्ही मोठे मानीत नाही असे म्हणून एकदा या हालचालीत कोठे तरी एक लढाई दिलीच पाहिजे असे म्हणून बेळगावास खासगी चर्चेत काही लोकानी त्यांच्या तोंडावर कसून विरोध केला. राष्ट्रीयसभेत आपण गेलो असता काय घडून येणार आहे आणि आपल्या होमरूलच्या चळवळीच्या दृष्टीनेहि ते उपयुक्त कसे आहे हे टिळकानी परोपरीने भविष्याच्या रूपाने चित्रासारखे रंगवून सांगितले. पण प्रतिभेच्या दृष्टीने म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी पाहण्याच्या दृष्टीने अधिक सरस असेहि लोक तेथे असता त्यांच्या डोळ्यावर रुढ अशा पूर्वग्रहांची झांपड पडली. वाद बराच विकोपाला गेला. १९०७ साली टिळकाना राजकारण कळत नाही असे म्हणण्याची पुण्यानाशकाकडे जी एक दम निघाली होती तिचा क्षणभर पुनर्जन्म झाला. आणि समेट कराव- याला जाता आपसातच बिघाड व फूट पडते की काय अशी भीति वाटू लागली. पण समेटाला विरोध करणाऱ्या मध्येहि दोन वर्ग होते. एक टिळकांवर व त्यांच्या तारतम्य बुद्धीवर पूर्ण निष्ठा ठेवणारा, आणि दुसरा त्यांच्यासंबंधाने आदबुद्धि असली तरी 'त्यांचे कोठे तरी चुकते आहे. हा घडा अजून थोडा कोठे तरी कच्चा आहे' असे म्हणून स्वतःच्या पक्केपणाची घमेंड बाळगिणारा यामुळे युक्तिवाद व्हाव- याचा तितका झाल्यावर निर्णयाच्या वेळी निष्ठा व संशययुक्त आदर यांच्यातच लढाई जुंपली आणि शेवटी निष्ठावंतानी जय मिळविला. पण टिळकांच्या पेक्षाहि सातारच्या सभेत ज्यांच्यावर हल्ला झाला होता त्यांचाच तो जय विशेष होय. टिळक बॅपटिस्टा बेळवी यांच्या कमिटीने आपला रिपोर्ट ता. १९ एप्रिल १९१६ रोजी प्रसिद्ध केला व त्यालाच या परिषदेत दुजोरा मिळाला. पुढे या सालच्या काँग्रेसमध्ये प्रविष्ट होऊन राष्ट्रीय पक्षाने जमेल त्याप्रमाणे घटनेत आणखी दुरुस्त्या करून घेतल्या. पण एकदा तो जाऊन राष्ट्रीय सभेला प्रत्यक्ष मिळाल्यावर समेटाचा वाद अर्थातच राहिला नाही म्हणून त्या रिपोर्टातील तपशील येथे सांगत नाही. असो. समेटाच्या ठरावात "स्वदेशाच्या हिताकडे दूरवर दृष्टि देता व सध्याची