पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ समेटाचा वाद लोकाकडून पाडण्यात आली होती. साताऱ्यास जमलेले लोक बरोबरीचे हाणून त्यांना उघड विरोध करता आला नागपूरासहि असेच झाले. - हल्लीच्या असहकारितेच्या वादात असा एक प्रश्न निघतोच की नाही की टिळक असते तर त्यानी गांधीचे मत स्वीकारले असते की त्याला विरोध केला असता ? पण टिळक हे वारलेलेच असल्यामुळे त्यांचे मत असे असते असे उलट सुलट कोणीहि बोलले तरी त्याला खोडून काढण्याला मार्गच उरलेला नाही. टिळकांचा गांधींच्या तत्वाना विरोध झाला असता असे म्हणणारा मरणकालपर्यंतच्या त्यांच्या मताचा उल्लेख आधारभूत म्हणून दाखवू शकतो. तरी प्रश्न शिल्लक उरतोच की ते त्यांचे मत १९२० सालच्या प्रारंभीचे होते पण इतक्या घालमेली मध्यंतरी झाल्या- नंतर त्यांचे मत कसे झाले असते ? आणि मग याला मात्र उत्तर देण्याला साधन नाही. कारण टिळकाना कोणाला विचारता येत नाही व त्याना कोणाला सांगता येत नाही. ढवळलेल्या पाण्यात कोळी आपले जाळे टाकून आंधळे झालेले मासे सहज पकडतो असे म्हणतात. त्याप्रमाणे सहकारिता असहकारिता या वादाने लोकमत मूळापासून ढवळून निघालेले पाहून 'लँचेटवाल्यानी' थोडासा हंगाम साधण्याचा. प्रयत्न केला. आणि एकदोन ठिकाणी असे प्रसिद्ध झाले की केळकरानी असह- कारितेला विरोध चालविला याबद्दल टिळक क्रोधाने लाल झाले असून ते केळ- कराना खाऊ की गिळू असे म्हणत आहेत. पण प्लॅवेंटची विद्या ही दुतर्फी असते हे त्या विचाऱ्याना काय माहीत ? या टिळकांच्या दिव्यसंदेशाना उलटे उत्तर मिळविण्याला केळकरांच्या स्नेह्याना प्लॅनेट चालविण्याचे कारण पडले नाही. कारण त्यावर त्यांचा विश्वास नसून वादातील बाजू परतविण्याकरिताहि त्यानी त्याला स्पर्श केला नाही. पण प्लॅचेटवर विश्वास असणाऱ्या लोकात हाच प्रश्न विचारणारे अनेक निघाल्यामुळे केत्येकाना उलटीहि उत्तरे मिळाली! बिचारे टिळक काय ? परलोकविद्यासंपन्न लोकांचे ते इतके बंदे होऊन राहिले आहेत की हाकेसरशी ते इतर माहात्म्यांच्या संगतीत गोष्टी बोलत असले तरी धावून मुंबईतील एखाद्या चाळीच्या खोलीत अवतीर्ण होतात. पण त्यांच्या ठिकाणी पक्षपात नसल्यामुळे ते दुतर्फी माणसांच्या बोलण्यावरून येऊन एकाजवळ होय म्हणतात एकाजवळ नाही म्हणतात. मिळून टिळकांच्या निंदकानी जिवंतपणी त्यांच्यावर लपंडावीचे. उडवा-. उडवीचे विसंगत बोलण्याचे या बोटावरची थुंकी त्या बोटावर नेण्याचे आरोप चालविले होते त्यांच्या समर्थनाला अशा रीतीने आणखी पुरावा मिळाला! आणि जुनी जी म्हण की 'जित्याची खोड मेल्याशिवाय नाही' ती बदलून जित्याची खोड. मेल्यावरहि जात नाही अशी नवीन म्हण बनविण्यासारखी झाली. पण आता हा वाद जगाच्या अंतापर्यंत राहणार त्याला इलाज नाही. सांग- ण्याचा मुद्दा हा की टिळक मंडालेस असता ते परलोकात असल्याप्रमाणेच अगम्य यामुळे हल्लीसारखाच एक वाद तेव्हा निघाला होता. आणि दुर्दैवाने तेव्हा प्लँचेटची विद्या इतकी फैलावली नव्हती. आणि कोणाला ती तेव्हा येत असली तरी त्याने