पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग २ प्रथम प्रगट झाली ती म्हटली म्हणजे ब्राह्मणेतरांची चळवळ. ब्राह्मणेतर वादाला प्रगट स्वरूप रा. ब. अरताळ बेळगाव जिल्ह्यातील लिंगायत जातीचे डेप्युटी कले- क्टर यानी आणिले. सरकार पक्षाचे म्हणून टिळक विरोधी आणि लिंगायत म्हणून ब्राह्मणविरोधी अशा दोन भूमिका त्यांच्यामध्ये एकवटलेल्या होत्या. म्हणून त्याना पुढे करून थोड्याशा जैन लिंगायत लोकानी 'ही ब्राह्मणाची सभा' आहे असे म्हणून प्रांतिक परिषदेचा निषेध करण्याकरिता एक वेगळी सभा भरविली पण तिला अर्थात फार थोडे लोक आले आणि त्याचा तो बेत फसला. कारण खुद्द प्रां. परि- प्रदेलाच ३० जैन ५० लिंगायत व पंधरा मुसलमान प्रतिनिधी आले होते व इतर वर्गांचे ब्राह्मणेतरहि पुष्कळच होते. टिळकांच्या मिरवणुकीला एका लिंगा- यत सावकारानेच आपली गाडी दिली होती. यानंतर ब्राह्मणेतर चळवळ विशेष जोराने सुरु झाली व तिचा उल्लेख पुढे थोडा येणारच आहे. तथापि या चळ- वळीचे हे प्रथमदर्शन म्हणून येथे तिच्याविषयी उल्लेख केला आहे. (३) समेटाचा वाद असा परिषदेत अनेक ठराव मंजूर झाले. त्यांत एक ठराव लष्करातील जागां- विषयी व स्वयंसेवका विषयी एक राजकीय कैद्याना मुक्त करण्याविषयी एक होमरूलची योजना ताबडतोब तयार करण्याविषयी एक स्वदेशी उद्योगधंद्याविषयी असे निरनि- राळे होते. पण समेटाचा ठराव हा महत्त्वाचा असून त्यात असे हाटले होते की टिळक. वेळवी वॉल्टस्टा यांच्या कमिटीने केलेला रिपोर्ट परिषदेला मान्य आहे आणि " स्वदेशाच्या हिताकडे दूरवर दृष्टी देता आणि सध्याची परिस्थिति पाहता दोन्ही पक्षामध्ये समेट होणे इष्ट आहे. म्हणून मुंबईस काँग्रेसने घटनेत केलेली दुरुस्ती पूर्ण समाधानकारक नसली तरी ती मान्य करावी आणि राष्ट्रीय सभेत जाऊन अधिक वाटाघाट व खटपट करावयाची. तिजकरिता टिळक खापर्डे बॅप्टिस्टा केळकर बेळवी इतक्या लोकांची कमिटी नेमावी. " या ठरावाला महत्त्वाचा णण्याचे कारण असे की १९१४ साली सातारा येथे राष्ट्रीय पक्षातल्याच लोकात जशी रणे माजली तशीच ती नागपुरासहि माजली होती. सातारची सभा टिळक मंडाले येथे असताना भरलेली म्हणून तेथे समेटाविरुद्ध असणाऱ्या लोकाना असे सहजच म्हणता आले की या विषयावरील टिळकांची मते कळण्याला मार्ग नाही म्हणून आम्ही काही एखादी गोष्ट करून त्याच्या मार्गात उद्या अडचण उत्पन्न करून ठेवणे बरोबर नाही. हे दिसण्यात ठीक होते. पण सुरतेच्या फुटीनंतर व कन्व्हे न्शनच्या स्थापनेनंतर स्वतः टिळकांनीच समेट होण्याकरिता कमिट्या नेमल्या परिषदेतून ठराव करविले. यावरून एकी करण्याला अनुकूल असे त्यांचे मत स्पष्ट दिसून आले होते ते केवळ तुरुंगात गेल्यामुळे बदलले असे मानण्याचे कारण नव्हते. पण समेटाला अनुकूल असे जे लोक बोलतील त्याना आपल्यातील मवाळ आणि प्रतिकूल बोलतील त्याना आपल्यातील जहाल असे म्हणण्याची रीत काही