पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ बेळगावची प्रांतिक परिषद स्थानावर फिरत न ठेवता हिंदी जनतेच्या अंगचे गुण प्रगट होण्याला सवड मिळेल अशा धोरणाने राज्यकारभारात सुधारणा केल्या पाहिजेत ही गोष्ट त्यानी मान्य केली. या सभेवरून दोन गोष्टी दिसून आल्या त्या या की टिळक हे सर- कारावर बहिष्कार घालण्याला तयार झालेले नव्हते. तसा त्यांचा इरादा नव्हता. आणि इंग्रज अधिकारी झाला म्हणून त्याचे गुण घेऊच नयेत अशी शपथ टिळ- कानी वाहिलेली नव्हती. राष्ट्रीय पक्षामध्ये ध्येयासंबंधी नेमस्तापेक्षा अधिक उता- बळेपणा असला तरी विवेकशीलता नव्हतीच असे नाही. ता. २९ एप्रिल रोजी बेळगाव येथे अठरावी प्रांतिक परिषद भरली. पूर्वी जाहीर केल्यापेक्षा ही सभा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली होती. सभेचे अध्यक्षस्थान दादासाहेब खापर्डे याना देण्यात आले होते. त्यांचे व टिळकांचे स्वागत सातारा स्टेशनपासून बेळगाव पर्यंत एकसारखे सुरू होते. स्टेशनावर स्वागत समारंभ फार मोठा झाला. जैन लिंगायत इनामदार व्यापारी सर्व प्रकारचे लोक आले होते. स्वागताध्यक्ष बेळवी यानी प्रारंभी वीस वर्षापूर्वी १८९५ साली वाच्छा यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या प्रांतिक परिषदेची आठवण करून दिली. आणि फेरोजशहा मेथा व गोखले यांच्या संबंधी आदरपूर्वक दुःखोद्गार काढले. अध्यक्ष दादासाहेब खापर्डे हे भाषणात म्हणाले की युद्धात प्रत्यक्ष विजय सरका- रच्या हाती पडेपर्यंत राजकीय वादाचे प्रश्न पुढे आणूं नयेत असे कित्येक म्हणतात. पण ती 'चूक आहे. हक्काना आताच जपले पाहिजे. इंग्लंड यापूर्वीच वसाहतीशी कानगोष्टी करूं लागले आहे मग आम्हालाच तेवढे का विचारीत नाही ? स्वरा- ज्याची मागणी करणे कायदेशीर आहे असे आमच्या एका कमिटीने ठरविले. आणि मग मुंबई महाराष्ट्र वन्हाड याच्या पुरता एक होमरूल लीग प्रारंभी स्थापावा असेहि डिसेंबरात ठरले आहे. समेटासंबंधाने खापर्डे म्हणाले की राष्ट्रीय सभेच्या इतिहासांत हळुहळू स्थित्यंतरे होत आली. प्रथम म्हणत प्रांतानिहायच चळवळ करावी. मग ह्यूम यांच्या सल्ल्यावरून सर्व हिंदुस्थानची मिळून ती करावी असे ठरले. मग प्रश्न निघाला की काँग्रेसने ठराव करावे पण त्यांचा अंमल करू नये. १९०५ साली बनारस येथील राष्ट्रीय सभेत प्रगतिपर असे अनेक ठराव लोकानी पुढे आणले पण वतनदार अधिकांऱ्याच्या दडपणामुळे बहुमताला गप्प बसावे लागले. हे ठराव १९०६ साली कलकत्त्यास पास झाले, पण नागपुरास ते पुनः कायम होतील असे पाहून सभा तेथून काढून सुरतेस नेण्यात आली. पण तेथे मोठी फूट पडली. तेथपासून कॉंग्रेसला नेमस्तपक्षाच्या क्लबाचे स्वरूप आले आहे. पण ते बदलण्याचा प्रयत्न हळुहळू होत आहे व मुंबईस त्याला थोडे यशही आले. मवाळ व जहाल ही नावे कोणी घेतली कोणी दिली ती चूक की बरोबर कसे हि असले तरी जो तो पक्ष आपला स्वभाव बदलू शकत नाही पण निरनिराळ्या स्वभावाच्याहि पक्षाना एकत्र जमून राष्ट्रकार्य करता येईल. या बेळगावच्या परिषदेच्या वेळी जी एक गोष्ट आजवर दबून दबून 'असलेली