पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ लो० टिळकांचे चरित्र भाग २ तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानाहि हे कोडे येऊन पडलेच. ते असे की राष्ट्रीय सभेच्या ज्या घटनेला सुरतेस व त्यानंतर राष्ट्रीय पक्षाने हरकत घेतली ती बहुधा तशीच अमलांत होती. अर्थात पूर्वी जी गोष्ट वर्ज मानली तिचा स्वीकार करणे हे विसंगत ठरते. टिळकांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचे लोक कोणतीहि तडजोड करून राष्ट्रीय सभेत शिरते तर टिळकांचे काम सोपे झाले असते. पण असे होण्याऐवजी काही प्रमुख लोक अशा अढीचे धोरण धरून बसले होते की बाटेल ते झाले तरी या राष्ट्रीय सभेत म्हणून शिरावयाचे नाही. आणि पुष्कळांनी मनांत अशी आशाहि बाळगिली होती की त्यांच्या पुढारीपणाखाली आपण दुसरी राष्ट्रीय सभा काढू. अशी वेगळी सभा काढण्याची कल्पना टिळकांच्या तुरुंग- वासाच्या पहिल्या वर्षीच निघाली होती. पण तिला सरकारने परवानगीच दिली नाही. आणि त्यापुढे संबध ५ वर्षे फिरून त्या बाजूचा कोणी प्रयत्नहि कैला नाही. पण या दोन अडचणीच्या अगदी उलट अशी ही एक अडचण टिळकांना भासत होती ती ही की राष्ट्रीय सभेत न शिरता आपण बाहेर राहिलो तर दुफळी होते. आणि वेगळी राष्ट्रीय सभा स्थापवयाची म्हटली तर लोकांचे पाठबळ मिळावे तितके न मिळाल्याने तो प्रयत्न अगदीच दास्यास्पद होणार. म्हणून त्यांनी प्रथम आपले मनुष्यबल अजमावण्याकरिता स्वतंत्र प्रांतिक सभा भरविली होती व त्यांत यश आले होते. पण याच बळाचा उपयोग राष्ट्रीयसभेत घुसून केला तर अधिक श्रेयस्कर असे वाटून त्यानीं तो प्रश्न आपल्या पक्षाच्या परिषदे- पुढे ठेवण्याचे ठरविले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यास एक अपूर्व जाहीर सभा झाली. लॉर्ड हार्डिज हे स्वदेशाला जाण्याला निघाले होते आणि हिंदुस्थानातील त्यांची कामगिरी एकंदरीने इतकी चांगली झाली होती की त्याविषयी कोणत्याहि पक्षाचा मतभेद नव्हता. म्हणून पुणे जिल्ह्याच्या व नागरिकांच्या तर्फे त्यांजकडे मानपत्र पाठविण्याबद्दल सभा भरवावी असे ठरून ती ता. २९ मार्च रोजी थिएटरात भर- विण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. अण्णासाहेब पटवर्धन हे होते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून संदेश आले होते. मुख्य ठराव कृष्णाजीपंत खाडिलकर यानी मांडला त्यात 'संकटाना न जुमानता लॉर्ड हार्डिज यानी हिंदी लोकांच्या आकांक्षा- बद्दल जी सहानुभूति दाखविली व त्यांच्या उन्नतीविषयी जी स्त्रटपट केली तीज- बद्दल ही सभा कृतज्ञता व्यक्त करिते' असा होता. ठराव मांडताना खाडिलकर यानी लॉर्ड हार्डिज यांच्या कारकीर्दीचे समालोचन करून त्यांच्या व्यक्तिविषयक गुणांचे आणि हिंदुस्थानाविषयी प्रगट केलेल्या सहानुभूतीचे अभिनंदन केले. या ठरावाला टिळकानी पुष्टि दिली व सांगितले कीं लॉर्ड रिपन यांच्यानंतर ती वर्षांनी असा प्रगतिपर व्हाईसरॉय हिंदुस्थानाला लाभला नाही. लॉर्ड कर्झन यानी ज्या आकांक्षा अशक्य कोटीतल्या ठरविल्या त्याच लॉर्ड हार्डिज यानी न्याय्य व योग्य आहेत असे कबूल केले. इंग्रजी राज्यपद्धतीचा वरवंटा पूर्वीप्रमाणेच हिंदु-