पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ अनुकूलतेची भरती ३ थिएटरात टिळकांच्या अध्यक्षतेखाली जी व्याख्याने दिली होमरूल लीगच्या तत्त्वाना अनुसरून असेच भाषण केले. आणि आम्ही काँग्रेसच्या घटनेची सुधा- रणा केली आहे आता तुम्ही येऊन आह्माला मिळा ह्मणजे तुझी आह्मी मिळून पुढील कार्य करू असे सांगितले. बेझांटवाई मुंबईस फक्त उपसूचना करून थांबल्या नाहीत. लवकरच How India wrought for Freodom या नावाचे एक पुस्तक राजकीय शिक्षण देण्याकरिता व स्वराज्याची चळवळ करण्याकरिता त्यानी काढले. त्यांत पूर्वीपासून हिंदुस्थानातील राजकारणाचा इतिहास व आकड्यामुद्यानिशी हकीगत दिली होती. इंडियन रिव्हयूच्या जानेवारीच्या अंकात श्रीनिवास शास्त्री यानी असे लिहिले की स्वराज्याला हिंदी लोक आज पात्र नाहीत असा जो आम्हाला प्रश्न विचारला जातो त्याला सर सत्येंद्रसिंह यानी आपल्या भाषणांत मुंबईस उत्तर द्यावयास पाहिजे होते. आणि पूर्वीप्रमाणे मोघम आश्वासने न देता वाटेल तर पंचवीस हाणा तीस ह्मणा पण काही ठरीव मुदतीत हिंदुस्थानाला स्वराज्य देऊ असे सरकारने आश्वा सन द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षाने करावयास पाहिजे होती. अशा रीतीने होमरूल लीगच्या चळवळीची प्रस्तावना राष्ट्रीय पक्षाप्रमाणे नेमस्त पक्षा- तले लोकहि करू लागले होते. (२) बेळगावची प्रांतिक परिषद टिळकांनी १९१६ सालच्या प्रारंभापासून जे सजोड धोरण स्वीकारल्याचे पूर्वी सांगितले त्याचा अंमल करण्याचा उद्योग त्यांनी आता सुरू केला. काँग्रेसमधील प्रवेश आणि महाराष्ट्र होमरूल लीगची स्थापना हे दोन विषय चर्चेला काढ- ण्याला एप्रिलात बेळगाव येथे भरणारी प्रांतिक परिषद ही योग्य संधि आहे असे त्यांनी ठरविले. परिषदेच्या तारखा २७, २८, २९ एप्रिल या ठरविण्यात आल्या. फेब्रूवारीच्या १५ व्या तारखेस बेळगावच्या पुढाऱ्यानी परिषदेची जाहीरपत्रके काढण्याची सुरवात केली. स्वागतमंडळ बनवून बेळवी यांना त्याचे अध्यक्ष निवडले आणि विषयाची पूर्वसूचना दिली त्यात काँग्रेसच्या घटनेतील दुरुस्ती आणि होमरूल हे विषय प्रामुख्याने घातले. बेळगावच्या परिषदेत राष्ट्रीयपक्षाने राष्ट्रीय सभेत शिरण्याचा ठराव केला. त्याबरोबर चळवळीला एक नवेच तोंड लागले. १९०८ पासून १९१५ पर्यंत हा पक्ष राष्ट्रीयसभेला पराङमुख झाला होता. पैकी पहिली सहा वर्षे टिळक तुरुंगांत असल्यामुळे त्यांच्या पश्चात राष्ट्रीय सभेत शिरावे का नाही हैं धोरण ठरविण्याची जबाबदारी घेण्याची छाती राष्ट्रीय पक्षाची झाली नाही. मध्यन्तरी सातारा येथे राष्ट्रीय पक्षाची सभा भरली तीत या धोरणाचा प्रश्न फारच वादग्रस्त ठरला. पण तेथेहि "उभय पक्षाची तडजोड व्हावी, समेटाचा प्रयत्न व्हावा" इतक्या बेताचेच ठराव पुढे आला होता. राष्ट्रीय सभेत शिरावे असा प्रत्यक्ष ठराव नव्हता. टिळक