पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भोग ९ उपसंहार હું केच राम वनवासाला निघाल्याचे चित्र चित्ताकर्षक असते. ग्रीक पुराणातला योद्धा हेक्टर घेतला तर तो वीरश्रीने रणांगणाकडे निघाला असता त्याची स्त्री अँड्रोमकी ही त्याला जाऊ नको म्हणून विनवीत आहे हा एक प्रसंग, हेक्टर व अकिलीज यांच्या घनघोर युद्धाचा दुसरा प्रसंग, किंवा अकिलीज हा हेक्टरचे प्रेत आपल्या रथाला जोडून फरपटत नेत असता किल्ल्याच्या तटावरून अँड्रोमॅकीच्या नजरेला ते पडते हा तिसरा प्रसंग, हे सर्वच चित्रार्पित करण्यासारखे आहेत. लहान गोष्टींची मोठ्याशी तुलना करावयाची तर असे म्हणता येईल की टिळकांच्या चरित्रात चित्रे करून ठेवण्यासारखे अनेक प्रसंग आले, पण प्रथम दर्शविलेले दोन प्रसंग हेच चित्रकाराला अधिक प्रिय होतील. टिळक केसरीचा किंवा एखाद्या ग्रंथाचा मजकूर लेखकाला सांगत बसले आहेत, ते एखाद्या सभेत उभे राहून व्याख्यान देत आहेत, ते वाढदिवसाचा अहेर किंवा एखादे मानपत्र स्वीकारीत आहेत, ते बंदरावर आगबोटीत चढत किंवा उतरत आहेत, असे इतर अनेक प्रसंगहि चित्रकाराला सुचविता येण्यासारखे आहेत. पण तो खचित म्हणेल की वरील दोन प्रसंगच मला अधिक पटतात. म्हटले तर हे दोनहि प्रसंग फारसे इष्ट नव्हते. ते टळावे अशी टिळकांची व इतरांचीहि इच्छा असणार. ते प्रसंग अपयशाचे असे दिसण्यात दिसतात. कारण एक तर खटला अंगावर येऊन काळेपाण्याची शिक्षा होण्याचा, व दुसरा सुरतेची काँग्रेस मोडल्याच्या आक्षेपाचा ! पण या दोन्ही प्रसंगात टिळकांचे व्यक्तिवैशिष्टय दिसून आले. दोन्ही प्रसंग वीरश्रीचे तेज प्रगट होण्याचे रोमहर्षणाचे असेच होते. व या प्रसंगांचे चित्र काढले असता ते जितके टिळकांविषयी यथार्थ गुणदर्शक होईल तितके इतर कोणत्याहि प्रसंगाचे होणार नाहीत ! टिळकांच्या संबंधाने संकलित करून देण्यासारखी माहिती वाटली ती वर दिल्ली आहे. पण यापलीकडे जाऊन विशेषणे लावून त्यांचे वर्णन करणे ही गोष्ट सहजच कठीण होऊन बसते. विशेषणे वापरण्याच्या कामी आपल्या इकडे करावी तेवढी काटकसर केली जात नाही यामुळे दुहेरी तोटा होतो. एक तर अपात्र अशा व्यक्तीना लावल्याने ती विशेषणे निरर्थक बनत जातात. शिवाय सत्पात्र अशाहि लोकासंबंधी बोलताना ती उगीच वरचेवर उपयोगात आणल्याने सदोष पुनरुक्तीचा परिणाम वीट किंवा उपहासबुद्धि यात होतो. 'राजमान्य राजश्री' प्रमाणे 'श्रीयुत' हा शब्द आता जवळजवळ फुकटच गेला आहे. समाज-सत्तावादी लोक 'कॉमरेड' हा शब्द इतका विपुल वापरतात की त्याचा मूळचा सुंदर अर्थ लोपून गेला आहे. आणि खऱ्या अर्थाने 'सहानुभवी सहकारी मित्रा'ला आता एखादा नवाच शब्द हुडकून काढावा लागेल. 'देशभक्त' व 'देशबंधु' या शब्दांचा उपयोग आपल्या इकडे पूर्वी इतका बेसुमार झाला व कदाचित् अजूनहि होत आहे की ते शब्द कानावरून नुसत्या वान्यासारखे निघून जातात व त्यांचा मनावर काहीच बोध होत नाही. टिळ- कांसंबंधाने बोलताना 'लोकमान्य' या सुंदर शब्दाचाहि आमच्यामते असाच दुरुप-