पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ टो• टिळकांचे चरित्र भांग ९ तोच टाइप सबंध केसरी करता वापरण्याचा विचार आहे. आणि वाचकांच्या दृष्टीने तो रूढ झाला म्हणजे तोच लायनो टाइप यंत्रावर बसवून घेण्याची योजना होईल. वर दिलेल्या टिळकांच्या पत्रात असे लिहिले आहे की “पुढे केसरी आठ- वड्यातून दोनदा किंवा तीनदा तिघाला तरी दुसरे मशीन घ्यावयास नको. " वरील शब्दात जी सुधारणा सुचविली आहे तिजपैकी केसरी आठवड्यातून दोनदा काढ- ण्याची योजना हल्ली विचारात असून कदाचित पुढील वर्षापासून ती फलद्रूप होईल. . (४) उपसंहार असो. अशा रीतीने हे टिळक चरित्र संपले. आता फक्त उपसंहारादाखल दोन शब्द लिहितो. सुरत येथील राष्ट्रीय सभेच्या मंडपात टिळक प्लॅटफॉर्मवर चढून गेले व छातीवर हात आडवे धरून "मी जागा सोडणार नाही वाटेल तर मला ओढून काढा " असे म्हणाले तो क्षण त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा असा एक होता. त्याच्या बरोबरीचा असा दुसरा एक क्षण त्यांच्या आयुष्यात आणखी आला. व १९०८ साली मुंबई हायकोर्टात न्या० दावर यानी सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सांगितली व टिळकानी त्याना उत्तर दिले तो होय. कदाचित् या पहिल्या व दुसऱ्या क्षणात कार्यकारणाचा सूक्ष्म संबंधहि मानिता येईल. टिळकांवर १९०८ चा खटला होण्याची जी अनेक कारणे झाली त्यापैकी सुरतेस राष्ट्रीय सभा मोडली हे एक होते यात शंका नाही. ते कसेद्दि असो. मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण कोणता असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याचे उत्तर देण्याची एक रीत त्यालाच उलट एक प्रश्न विचारणे ही होऊ शकते. तो प्रश्न असा की "समजा तुमच्या या मनुष्यासंबंधी एखादे चित्र हस्तकौशल्याने रंगवून ठेवावयाचे आहे तर त्या चित्राला कोणता प्रसंग चित्रकार पसंत करील?" या दुसन्या प्रश्नाचे उत्तर तेच पहिल्याचे ! अशा उलट्या रीतीने उत्तर देण्याचे कारण असे की, कोणाहि मनुष्याच्या आयुष्यात महत्त्वाचे असे क्षण पुष्कळ असतात. पण महत्त्वा महत्त्वातले तारतम्य ठरविताना चित्रकार हेच लक्षात घेतो की ज्या प्रसंगावर प्रेक्षकाची दृष्टि ठरून कायम होईल, इतकेच नव्हे तर ज्या प्रसंगाची कल्पना मनात आली असता प्रतिक्षणी अद्भुतत्वाचा 'नवनवोन्मेष ' होईल, तोच प्रसंग अधिक महत्त्वाचा. या दृष्टीने पाहता कोणाच्या आयुष्या- तील यशाप्रमाणे अपयशाचे, विजयाप्रमाणे पराभवाचे, सुखाप्रमाणे दुःखा- चेहि प्रसंग स्मरणीय होऊ शकतात. कारण या उभयविध प्रसंगातहि हृदय- स्पर्शीपणाचा व उदात्तपणाचा गुण सारखाच असतो. बुद्धचरित्रात गौतम बुद्ध हा ज्ञानसंपन्न झाल्यानंतर शिष्याना उपदेश करीत आहे या शांतरसात्मक प्रसंगाइतकाच तो राजपुत्र असता निद्रिस्त अशा पत्नीला विरहसमुद्रात लोटून निघाल्याचा करुणप्रसंगहि चित्र काढण्याला योग्य ठरेल. रामरावणाचे युद्धाइत-