पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• भांग ९ टिळकांचा सांप्रदाय ४७ "हली केसरीचा आकार ४५४३० आहे. पण या मशीनवर ४०X३० पासून ४०x६० पर्यंत ( म्हणजे कॉड सब रॉयल किंवा कॉड रॉयल) कागद छापला जाईल. " मशीन सुमारे १२ फूट लांब ९ फूट रुंद व फक्त ६ फूट उंच आहे म्हणजे आटोपशीर आहे. खाली खड्डा खणण्याची जरूर नाही. "हे मशीन चालविण्यास ऑईल इंजिन दहा हॉर्स पॉवरचे लागेल. सध्याचे चालणार नाही. नवे घेतले पाहिजे. रा. पारधी यास विचारून तिकडे दहा हॉर्स पॉवरचे इंजिन मिळेल का नाही व केवढ्यास मिळेल ते उत्तरी कळवावे. नसल्यास येथे विकत घेऊ. "आता फक्त एक लहान मशीन मराठ्याकरिता व लिनो अगर मोनो टाइप घेणे आहे. चौकशीत आहे. "१९०१ साली टूफीडर घेऊन त्याप्रमाणे आज १८/१९ वर्षे काम चालले तद्वतच यापुढे वीसपंचवीस वर्षे पूर्ण उपयोगाला येईल असे हल्लीचे मशीन आहे. आठी पेज एकदम छापून व घड्या पाडून तासास ६ हजार प्रती डझनवार मोडून बाहेर पडतील. पुढे केसरी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा निघाला तरी दुसरे मशीन ध्यावयास नको. हल्लीचा केसरी म्हणजे ३२००० प्रती ६ तासात सर्व छापून होतील. रात्री बारा वाजता सुरू केले की दोन्ही फर्मे एकदम छापून व घड्या पडून सकाळला तयार !" या पत्रात उल्लेखिल्याप्रमाणे मराठ्याकरिता स्वतंत्र लहानसे छपाईचे यंत्र १९१९ साली घेण्यात आले व इल्ली मराठा त्यावरच छापण्यात येतो. १९१४ च्या संकल्पाप्रमाणे केसरी छापखाना व कचेरी यांच्याकरता ऑइलइंजिनला डाय- नेमो जोडून विजेचे दिवे लावण्याची व्यवस्था १९२२ पासून करण्यात आलेली आहे. लायनो टाइपवर केसरीचे टाइप जुळविण्याची व्यवस्था ही मात्र परतंत्र अस- ल्यामुळे ती टिळकाना आपल्या हयातीत अमलात आणता आली नाही. व त्यापुढे दि ती आजवर अमलात आलेली नाही. तथापि लायनो टाइपवर केसरी निघावयाचा तर त्याला आधी त्या यंत्रावर बसविता येतील असे अखंड टाइप बनवावे लाग- णार, व असे टाइप आपण करून दिले तरच विलायतचे कारखानदार ते स्वीका- रून लायनोटाइप बनवून देणार, म्हणून टिळकानी आपल्या कारखान्यात हे अखंड टाइप तयार केले. ही योजना टिळकांच्या मनात १९०६ सालापासून घोळत होती व त्यांच्या अखंड टाइपांचा एक संपूर्ण संच त्याच साली तयार झाला. फिरून त्याची सुधारणा १९१४ साली त्यांच्याच देखरेखीखाली झाली. आणि त्यानंतर त्यात आणखी सुधारणा १९२६ पासून सुरू आहे. या अखंड टाइपात कंपोज केलेला मजकूर केसरीत वेळोवेळी देण्यात येत असतो ही गोष्ट त्या टाइपांचे वळण व इतर टाइपांचे वळण यातील फरकावरून वाचकांच्या लक्षात आलीच आहे. या टाइपातील सुधारणा पूर्ण झाली म्हणजे पुढेमागे कदाचित्