पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ लौ० टिळकांचे चरित्र भांग ९ ण्यात येऊन वर्गणी ७ रु. ४ आणे टपालशीलासह होती ती ४ रुपये करण्यात आली. हा बदल झाला तेव्हा प्रथम मराठ्यात आठच पाने घालण्यात येत असत. पुढे ती कायमची १२ करण्यात आली व प्रसंगविशेषी १६ हि पाने घातली जात. १९०२ साली केसरीचा आकार वाढविला त्यापूर्वीच टिळकानी फडणिसांच्या वाड्यात आर्यभूषण प्रेसला लागून स्वतंत्र इमारत बांधून नवे मोठे छापण्याचे यंत्र बसविले होते. पुढे १९०४ साली टिळकानी गायकवाड सरकाराकडून त्यांचा पुण्यातील वाडा विकत घेतला. व १९०६ पासून छापखान्याचे काम टाइप जुळ- विण्याचे काम आणि केसरीमराठ्याचे संपादक व व्यवस्थापक यांच्या कचेरीचे काम तेथे सर्व एकत्र चालू लागले. टिळकांच्या हयातीत महायुद्धापासून केसरीच्या वर्गणीदारांची संख्या विशेष वाढू लागली तेव्हा हे जुने यंत्रहि अपुरे पडू लागले. टिळक मंडालेहून परत आल्यापासूनच छापखान्याची अंतर्बाह्य सुधारणा कर- ण्याचा विचार त्यांचे डोक्यात एकसारखा घोळत होता. १९१४ च्या पत्रव्य- वहारावरून असे दिसते की या साली विलायतेतील वॉकर कंपनीशी पत्रव्यवहार करून टिळकानी आपल्या नव्या छापखान्याकरिता विजेचे दिवे लावण्याची योजना केली होती व त्याकरिता मोटर डायनेमो बॅटरी ऍक्युम्युलेटर दिवे तारा लहानसे पंखे वगैरे सर्व आणविण्याचा बेत केला होता. फक्त इंजिन मात्र नवे न घेता जुन्यावरच भागविण्याचा त्यांचा विचार होता. या सर्वाला सुमारे १५०० रुपये खर्च येणार होता. परंतु जुन्या इंजिनने काम पुरे पडणार नाही, आणि या कार- णाकरिता जुने काढून टाकून नवे मोठे घ्यावयाचे तर आवाक्याबाहेर खर्च जाणार असा एकंदर अंदाज झाल्यामुळे त्यावेळी गायकवाडवाड्यात व कारखान्यात विजेचे दिवे लावण्याचा बेत रहित करण्यात आला. यानंतर चिरोल केसचा खर्च व वेळ खाणारे अनेक उद्योग निघाल्यामुळे नवीन छपाईचे यंत्र घेऊन बसवि- ण्याची टिळकांची कल्पना तशीच राहिली. पण टिळक विलायतेस गेल्यावर अना- यासेच ती त्याना फलद्रूप करता आली, व त्याप्रमाणे तेथे समक्ष पाहून त्यानी नव्या प्रकारचे एक छपाईचे यंत्र सुमारे २०००० रु. किंमतीचे विकत घेतले. या यंत्राचे वर्णन टिळकानी स्वदस्तुरचे पत्र धोंडोपंत विध्वंस याना लिहून त्यात दिले आहे ते खालीलप्रमाणे:- 66 आता जे मशीन घेणार ते सुटे कागद छापण्याचे नाही. कागदाची वाटोळी जुडकी ( rollers ) लावून दर तासास ६००० कॉपी ( ८ पेज एकदम ) छापून व घड्या पाडून तयार होतील असे मशीन आहे. तसेच सुट्टया टाइपाचा उपयोग न करिता stereo दर पेजास एक याप्रमाणे तयार करून आठ stereo वरून छापावे लागेल, stereoची मशीनरी मशीन बरोबरच विकत घेतलेली आहे. मशीन रवाना झाले म्हणजे कागदाचे रोलरना ऑर्डर देतो. मशीन सेकंड हँड आहे पण अगदी नव्यासारखे असून ज्या कंपनीने मशीन तयार केले त्याच कंपनीने ते सर्व तपासून नीट केले आहे. करिता काळजी नाही.