पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ टिळकांचा सांप्रदाय ४५ अवश्य होते म्हणून पूर्वीची वर्गणी १ रु. १३ आणे होती ती २ रु. ५ आ. कर- ण्यात आली. १९०२ साली जो आकार व मजकुराची जी बांधणी टिळ कानी निश्चित केली ती १९१२ पर्यंत तशीच चालू होती. या सुमारास केळकर यानी केसरीत वाढत्या मजकुराच्या सोयीकरता पुरवणी घालण्याला सुरवात केली, व कर्मधर्मसंयोगाने ज्या वर्षी प्रेस अॅक्ट अमलात आला त्याच वर्षी या पुरवणी - लाहि सुरुवात झाली. मात्र ही पुरवणी कायमची किंवा वर्गणीदारांच्या हक्काची अशी समजली जात नसे. संपादकाच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे मजकूर अधिक असेल किंवा नसेल त्याप्रमाणे, पुरवणी चालावी किंवा न घालावी असा क्रम सुरू होता. पण त्यातल्या त्यात पुरवणी घालणे हा नियम व न घालणे हा अपवाद होऊन बसला. महायुद्ध सुरू झाल्यानंतर बाजार किंमती सर्वच बेसुमार वाढल्या त्यात कागदाची किंमतहि भडकली. त्यामुळे टिळकाना केसरीची वर्गणी वाढवावी लागली ती १ आक्टोबर १९१६ पासून २ रुपये १३ आणे करण्यात आली. त्यानंतर तारीख १ जानेवारी १९१८ पासून ३ रुपये १३ आणे करण्यात आली. आणि ती टिळकांच्या मृत्यूपर्यंत व त्यानंतरहि तशीच कायम राहिली. १३ आणे टपाल हशील हे केसरीच्या पहिल्या दिवसापासून आजवर तसेच कायम राहिले आहे; पण वर्गणीच्या रकमेत प्रथम एक रुपाया नंतर दीड रुपया नंतर दोन रुपये व नंतर तीन रुपये याप्रमाणे वाढ झाली. पण केसरीत मजकुराचीहि वाढ त्याच मानाने झाली. व वाचकानीही या तीन्ही वाढींचे प्रमाण योग्य मानले याचे प्रत्यंतर हेच की वर्गणी वाढली असताहि वर्गणीदारांची संख्या देखील वाढती राहिली तारीख १ जानेवारी १९१८ पासून केसरीची वर्गणी ३ रुपया १३ आणे असता मध्यंतरी प्रथम दोन पानांची नंतर काही दिवस चार पानांची पुरवणी घालण्यात येऊन वाढत्या वर्गणीचा मोबदला वर्गणीदाराना देण्यात आला. आणि त्यापुढे नुसती पुरवणीच नव्हे तर केसरीची पानेहि बरोबर दुप्पट वाढवून म्हणजे ८ ची १६ करून केसरी त्याच वर्गणीत ता. १ जानेवारी १९२५ पासून आजवर सतत देण्यात येत आहे. ही वाढ व सुधारणा टिळकानाहि हवी होती, परंतु कागदाची किंमत वगैरे अनेक कारणानी आपल्या हयातीत त्याना ती करता आली नाही. केसरीबरोबरच मराठा पत्रहि टिळकांच्या मालकीचे होऊन त्यांच्या हाती आले. १८९७ साली सप्टेंबरच्या १२ तारखेपर्यंत टिळकांचे नाव मराठ्यावर संपादक म्हणून होते पण पुढील अंकापासून केळकरांचे नाव त्यांचे ठिकाणी दाखल करण्यात आले व यानंतर पुढे केव्हाहि टिळकानी संपादक म्हणून आपले नाव मराठ्यावर घातलेच नाही. तरी केसरीप्रमाणे मराठ्यावरहि त्यांची सतत देखरेख असे. व त्यांचेच धोरण म्हणजे केसरीचेच धोरण केवळ भाषांतर रूपाने नसले तरी युक्तिवादाच्या व तत्त्वाच्या दृष्टीने मराठ्यातून प्रकट व्हावे अशी शिस्त होती. मराठ्याच्या स्वरूपात व वर्गणीत या सर्व अवधीत एकदाच म्हणजे १९०३ साली फरक झाला. तो असा की पूर्वी मराठ्याचा आकार मोठा होता तो लहान कर-