पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ लो. टिळकांचे चरित्र भाग ऐ त्यांच्या सांप्रदायाचे मुख्य घटनासाधन. यांची स्थिति व प्रगति ही लोकाना विदितच आहेत म्हणून त्याविषयी विशेष लिहिण्याचे कारण नाही. तथापि नमूद करण्यासारख्या काही थोड्या गोष्टी खाली दिल्या आहेत. १८९८ साली तुरुंगातून सुटून आल्यावर थोडी विश्रांति घेऊन ता. ३ जुलै १८९९ रोजी टिळकानी केसरी आपल्या नावाने हाती घेतला तो १९०८ साली त्याना शिक्षा होईपर्यंत म्हणजे ता. २२ जुलै १९०८ पर्यंत त्यांचेच नावावर सतत होता. ता० २८ जुलै १९०८ पासून केसरीवर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाव दाखल झाले ते ता० ४ जानेवारी १९१० पर्यंत होते. पुढील अंकापासून केळकर हे केसरीचे संपादक झाले. ते ता० १२ मार्च १९१८ पर्यंत संपादक होते. या सुमारास स्वराज्य संघातर्फे शिष्टमंडळ विलायतेस जाण्या- करता कोलंबोस निघाले तेव्हा ता० १९ मार्च १९१८ रोजी फिरून केसरीचे संपादक म्हणून खाडिलकर यांचे नाव दाखल झाले. विलायतची ही सफर पास- पोर्ट न मिळाल्यामुळे कोलंबोहून परत फिरली व त्यानंतर केळकर १९१९ च्या एप्रिल अखेर विलायतेस जाईपर्यंत पुण्यासच होते. तथापि ते पुन्हा विलायतेस जाण्याकरता निघण्याचा संभव होता यामुळे खाडिलकर यांचेच हाती केसरीचे संपादकत्व ठेवण्यात आले होते. पण टिळक व केळकर हे विलायतेहून परत आल्यावर फिरून पूर्वीप्रमाणे तारीख २२ जून १९२० पासून केसरीचे संपादकत्व केळकरांकडे देण्यात आले. तात्पर्य १९०८ साली टिळकांचे नाव केसरीवरून संपादक या नात्याने निघाले ते कायमचेच निघाले. तथापि पुढे अखेरपर्यंत टिळक केसरीवर देखरेख ठेवीत इतकेच नव्हे तर एकादे वेळी केसरीकरिता लिहिलेले लेख तपासून देत, व त्यानी स्वतः हि वेळोवेळी अनेक लेख केसरीत लिहिले आहेत. १८९१ च्या पूर्वी काही वर्षे केसरीवर टिळकांचे नाव असले तरी प्रत्यक्ष त्या पत्राची मालकी किंवा देखरेखहि त्यांच्याकडे नसे. पण १८९१ पासून १९२० पर्यंत म्हणजे सुमारे २९ वर्षे टिळकांचा केसरीशी प्रत्यक्ष किंवा जिव्हाळ्याचा किंवा निकट संबंध होता. या मुदतीत केसरीच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे झाली. तशीच वर्गणी वगैरे इतर बाबतीतहि झाली. १९०२ सालापासून टिळकानी केसरीचा आकार तोच ठेऊन पाने दुप्पट केली. ही क्रांति पूर्वीच्या क्रांतिनंतर ११ वर्षांनी घडून आली. १८९१ साली क्रांति झाली होती ती इतकीच की ( वर्गणी तीच म्हणजे १ रु. १३ आ. पृष्ठसंख्या तीच म्हणजे बाहेरील दोन व आतील दोन मिळून चार पाने इतकीच ठेऊन) मोठ्या ऐवजी लहान टाइप घातला, म्हणजे मजकूर वाढविला. पण १९०२ साली ही सुधारणाहि अपुरी ठरल्याने आकार व टाईप तोच ठेऊन पाने दुप्पट वाढ- विली त्यामुळे संपादकीय लेखाप्रमाणेच लिहून आलेले लेख पत्रव्यवहार बातम्या बिन- संपादकीय लेख जाहीराती वगैरेची पुष्कळच अधिक सोय झाली. पण इतका मजकूर वाढविल्यावर छपाईच्या व इतर खर्चाच्या दृष्टीने वर्गणी वाढविणेहि ठेऊन व