पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ टिळकांचा सांप्रदाय ४३ होणार नाहीं अशी बढाई त्यानी कधीं मारली नाहीं. कारण "मनुष्य चुकीला पात्र आहे त्याप्रमाणे माझ्या हातून सरकारी कायद्याचे किंवा धर्माच्या कायद्याचे उल्लं घन चुकूनहि होणार नाही असे नाहीं. ईषेत तशी गोष्ट होऊनहि जाईल. तरीपण राजकारणात किंवा धर्मात मी अराजक नाही. काही व्यवस्था म्हणून हवी नियम म्हणून हवे व त्यांचे उल्लंघन झाले तर शिक्षा सोसण्याला मनुष्याने तयार असावे" असे टिळकांचे म्हणणे असे. (३) टिळकांचा सांप्रदाय टिळकानी गो. कृ. गोखले यांच्याप्रमाणे एखादी सोसायटी काढली नाही असा आक्षेप काही लोकाकडून घेण्यात येतो. पण त्याचे उत्तर इतकेच की अशी संस्था स्थापण्याशिवायहि तिजपासून होणारे इष्ट कार्य पुढाऱ्याच्या पदरात पडणे शक्य आहे. आणि सूक्ष्मपणे पाहणाराला हे फळ टिळकांच्या पदरात पडत असे असेच दिसून येईल. एखाद्या नियमावलीवर प्रतिज्ञेदाखल सही करून एखाद्या संस्थेचा कोणी सभासद झाला तरी त्याच्या हातून संस्थेचे कार्य पार पडणे किंवा न पडणे ही गोष्ट त्याच्या कर्तेपणावर व उत्साहावरच अवलंबून राहते. प्रतिज्ञा- लेख व नियम यानी एक प्रकारचे बंधन उत्पन्न होऊ शकते हे खरे, पण हे बंधन दिसण्यापुरतेच असते. सर्व्हेट ऑफ इंडिया सोसायटीचा उद्दिष्ट हेतू किती साधला किंवा तडीस गेला याविषयी आम्ही काही म्हणू इच्छित नाही. तथापि इतके माल म्हणू शकतो की अशी एखादी संस्था न काढताहि टिळकाना मनुष्यबल कधीहि कमी पडले नाही. त्यांची वर्तमानपत्रे चालविण्याला माणसे मिळाली यात काही विशेष नाही. पण त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी जेव्हा त्याना कोणचेहि इतर काम पडले त्यावेळी प्रतिज्ञालेख किंवा नियमाचे बंधन नसताहि केवळ हौसेने व अभि- मानाने त्यांचे काम तडीला नेण्याला माणूस वाटेल तेथे व वाटेल तितके उभे राही. सद्दीच्या दिवसात एखाद्या संस्थेकरिता त्याना भरपूर माणसे व पैसाहि मिळाला असता. तथापि सहकारिता ही सहानुभूतीने व खऱ्या मनाने करण्याची गोष्ट आहे. ती केवळ नियमानी सिद्ध होत नाही असे टिळ- काना पूर्वी डेक्कन एजुकेशन सोसायटीत व बाहेरहि आढळून आल्यामुळे त्यानी अशी संस्था स्थापली नाही. वेळेला निघेल ते काम व हाताशी मिळेल तो मनुष्य अशीच त्यांची पद्धति असे. पण या दोहोंचीहि त्याना वाण पडली नाही. लोक- संग्रह करणारा कोणी असला तर त्याला नियमांचा पाश टाकल्याशिवाय मनुष्य- चल आपणाकडे ओढता येते. व नियमबद्ध संस्था तयार असली तरी तिला लोकानी येऊन मिळावे अशी स्फूर्ति संस्थेच्या चालकांमध्ये असेलच असे नाही. टिळकांचे सहकारी सैन्य हे खड्या फौजेसारखे नव्हते. तर त्याला नॅशनल मिलि- शिया सारखे स्वरूप होते. टिळकांची वर्तमानपत्रे म्हणजे केसरी मराठा हेच टि. उ...४८