पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ पासूनच ती त्याजकडून घेत असत. श्रीशंकराचार्य ( डॉ. कुर्तकोटी) यानी आपल्या आठवणीत असे सांगितले आहे की, आश्रम घेण्यापूर्वी कोल्हापूरच्या स्वामींचे शिष्यत्व स्वीकारावे की नाही याविषयी मी टिळकांचा सल्ला घेतला, तेव्हा टिळक मला म्हणाले " कोणाचे ऐकू नका. सरळ उठा. आणि कोल्हापूरला जाऊन आश्रम घ्या. आता काळ वेळ जाणणाऱ्या धर्मगुरू- चीच गरज आहे. मिशनऱ्याप्रमाणे हिंदुधर्मासाठी काम करणारांची जरूरी आहे. ह्याच्याचसाठी प्रोफेसर विजापूरकर आणि प्रोफेसर काशीनाथ बापूजी पाठक याना तुम्ही पीठावर बसा असे मी म्हणत होतो. पण तो योग जुळून आला नाही. बराच आचार्यपीठाकडून टिळकाना जी मान्यता मिळाली होती ती फुकट घ्यावी असे त्यांच्या मनात नव्हते म्हणून त्याना नित्य अशी चिंता असे की, आचार्य मंडळीनी आपल्या संस्थेची व्यवस्था नीट लावावी, कर्ज फेडावे, पूजा द्रव्याचा हिशेब नीट ठेवावा, त्यांचा उपयोग केवळ अन्नसंतर्पणाकडे न करिता जुन्या विद्यावृद्धीकडे करावा, काही धर्मस्थापनेचे कार्य करावे, आणि त्याकरिता काही घटना करून, आपले अधिकार संभाळून पण त्यातल्यात्यात थोडेसे लोक- मतद्दि पाहून म्हणजे प्रवृत्ति व निवृत्ति यांचा मेळ घालून निग्रह अनुग्रह व धर्मकार्य करावे. ते म्हणत "मठदेवता स्वयंसिद्ध आहे. स्वतः तिला पैशाची जरूरी नाही. पण मठाचा कारभार पैशावाचून चालत नाही. आचार्य पीठा- विषयी लोकांचा आदर पूर्वीपेक्षा कमी झाला असला तरी अजून शिल्लक आहे आणि लोकहि पूजाद्रव्य देऊन व इतर सत्कार करून संस्था चालवितात व बहुमान करतात. म्हणून हातचे गमावले असे धर्मगुरूनी समाजा- विषयी मानू नये. पण दिवसेदिवस लोकमत प्रभावी होणार म्हणून संस्थानाचा कारभार निर्विवाद उपयुक्त व प्रगतिपर व्हावा हे श्रेयस्कर. आणि तसे न होईल - तर आचार्यपीठे कालांतराने नष्ट होतील." पण त्यांच्या या चिंतेला खुद्द आचार्य- पीठाकडून मिळावा तसा जबाब मिळत नव्हता. टिळकानी कोणतीहि योजना सुचविली तरी तोंडापुरती स्तुति करावी, त्याना मोठेपणा द्यावा, भलेपणा द्यावा पण शेवटी प्रत्यक्ष काही करू नये. इतर कोणाहि अंहकारयुक्त लौकिक मनुष्या- प्रमाणे, त्यानी आपल्या हातचा अधिकार काडीइतकाहि गमाविण्याला तयार होऊ नये हा अनुभव टिळकाना अखेरपर्यंत आला व त्याचे त्याना वाईट वाटे. धर्मगुरूंचा अधिकार टिळक मानीत. अधिकार मानणे ही नुसती पहिली खूण आहे आणि ती दिळकानी पटविली होती. कारण पूर्वीच्या ग्रामण्यात त्यानी प्रायश्चित्त घेतले होते. आणि विलायतेहून परत आल्यावर देखील त्यानी प्रायश्चित्त घेतले. या दुसऱ्या वेळी त्यांचा लौकीक इतका वाढला होता की ब्रह्मवृंदानी - त्याना आपण होऊन माफी केली असती. तरीपण शास्त्र मर्यादा रक्षणासाठी आग्रह -दाखवावयाचा, मर्यादा वाढवून घ्यावयाच्या पण त्या असत तोपर्यंत पाळावयाच्या, हे राजकारणाप्रमाणे धर्मातहि टिळकांचे तत्त्व होते. मर्यादेचे उल्लंघन आपल्या हातून