पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ऐ सामाजिक व धार्मिक ४१ पण श्रीकडे अर्ज न गेल्यामुळे मंडळानेच पुढे काम चालविले. नातू व खाजगी- वाले हजर झाले पण त्यानी पक्षकार होण्याचे नाकारले. तेव्हा अर्जदार जोशी यांचा पुरावा व म्हणणे ऐकून घेण्यात आले. शेवटी मंडळाने असा निकाल दिला की टिळकांच्या कैफियतीवरून व पूर्वीच्या ग्रामण्यातील कागदपत्रावरून असे दिसते की पूर्वी टिळक यानी पंचहौद मिशनमध्ये चहा घेतल्यामुळे श्रीक्षेत्र काशी येथे सर्व प्रायश्चित्त घेतले व पुण्यासहि दोन कृच्छ्रे प्रायश्चित्त केले. त्यावर पुनः नातू यानी तक्रार केली होती त्यावरून पुनः चौकशी होऊन असे ठरले की "नवीन प्रायश्चित्ताची प्राप्ति होत नाही. व तो निकाल अद्यापि कायम आहे. जोशी यांचे या अजीतील आरोप चुकीचे आहेत व टिळक दोषमुक्त आहेत. आणि नवीन प्रायश्चित्त देण्याची त्याना कोणी तजवीज करील तर ते गैरशिस्त होईल." यानंतर टिळकांची आचार्य- पीठात थोडी बढतीच झाली आणि आरोपीला स्वतः आचार्यांच्या गादीच्या तंट्यात न्यायाधीश किंवा मंत्री होण्याचा मान मिळाला. दरबारच्या कलहात राज- निष्ठ बंडखोरांचे साधून जावे ही रीतच आहे. स्वतः गुरुस्वामी व शिष्यस्वामी यांचे बनेनासे झाले तेव्हा नवीन शिष्य करण्याचे त्यानी ठरविले व इतर चार लोकावरोवर टिळकाना पंच नेमून या प्रकरणी गुरुस्वामीना सल्ला देण्याची आज्ञा ता. १ ऑगस्ट १९०६ रोजी करण्यात आली. पळशेब्राह्मण प्रकरणात टिळ- काना कमिटीचे चिटणीस नेमण्यात आले. पुढे गुरु व शिष्य दोघे पुण्यास आले असता संस्थानचे काम कसे चालावे या संबंधाने टिळकांच्याच सूचनेवरून अधिकारविभागणीची घटनाहि त्यानी सुचविली. ता. ५ सप्टेंबर १९०६ रोजी टिळकाना शिष्यस्वामी यांच्याकडून अशी आज्ञा झाली की "गुरुस्वामी यानी संस्थानचे धर्मसंबंधी अधिकार मिळकत व उत्पन्न आमचे ताब्यात दिले आहे. तरी तुमच्यासारख्या धर्माभिमानी ब्रह्मवृंदांचे पुढारी शिष्यवर्गाची अत्यंत अवश्यकता आहे. आणि संस्थानदेवतेचा मनोदय असा आहे की संस्था- नच्या उत्पन्नाची योग्य व्यवस्था लावणे व ज्ञातीधर्मसंबंधी कामे चालविणे ते धर्मशास्त्रास व देशकालास अनुसरून करावे. या सर्व गोष्टी त्या त्या विषयातील विद्वान निस्पृह व कार्यदक्ष अधिकाऱ्याकडून कशा करवाव्या इत्यादि गोष्टींचा विचार करण्याकरिता तुम्ही व तुम्हास योग्य वाटतील ते इतर गृहस्थ घेऊन संकेश्वर मुक्कामी दर्शनास यावे. " अशा रीतीने टिळकांची प्रतिष्ठा व मान्यता आचार्यपीठाचे ठिकाणी वाढली व ती त्यानंतर अजूनहि कायम आहे ही गोष्ट इल्लीचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी हे टिळकाना सल्लागार मानतात इतकेच नव्हे तर त्यांचे राजकारण व त्यांचे गीताभाष्य यांचे बहुमानपूर्वक जाहीर समर्थन करतात यावरून दिसून येतच आहे. धर्मगुरूना योग्य सल्लामसलतीची अपेक्षा असे तेव्हा ती टिळका- कडूनच मिळे. आणि ही सल्लामसलत कोणी धर्मगुरूच्या गादीवर बसल्या- नंतर जशी मिळत होती तशी कित्येक व्यक्ती धर्मगुरू होण्याच्या आधी-