पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ लो० टिळकांचे चरित्र भाग २ संपले म्हणजे आपला पोोषख उतरून ठेवतो व इतर व्यवहारात तो आपला न्याया- धीशपणा विसरून जातो. पण स्वराज्याला हिंदुस्थान अपात्र ठरविणाऱ्या आमच्या कित्येक नेमस्त न्यायमूर्तीना आपली तांबडी झूल आणि शुभ्र अजागलस्तन केव्हाहि उतरून ठेवताच येत नाही. जुन्या पौराणिक नाटकमंडळीतील राक्षस पार्टी नटाप्रमाणे नाटक संपले तरी त्या पोषाखावरील त्यांचे प्रेम संपत नाही. आमच्या न्यायनिष्ठ न्यायमूर्तीना आईबाप या नावाचा विसर पडून घरीदारीसुद्धा ते वादी प्रतिवादी या भाषेतच बहुधा त्यांच्याशी बोलत असावेत. पण त्यांच्या लक्षात हैं येत नाही की, सगळेच हिंदी लोक जर स्वतः हिंदुस्थानचा न्याय करण्याला न्यायाधीश होऊन बसू लागले तर तुमच्या त्या हिंदुस्थानला वकील तरी कोण मिळावा ? न्यायकोर्टातसुद्धा खुनी कज्ज्यात आरोपीला वकील नसेल तर सरकार आपल्या खर्चाने वकील देते. किंवा न्यायाधीश कोर्टातल्याच एखाद्या वकीलाला तू याचे वकीलपत्र बेऊन काम चालीव असे सांगतो. आणि आरोपीला योग्य न्याय मिळावा म्हणून अवश्य असेल तेथे स्वतःच त्याची वकिली करतो. पण हिंदुस्थान इतक्या शिकंदर कमनशिबाचा आरोपी म्हटला पाहिजे की त्याला स्वराज्योपभोगाविषयीं पूर्ण अपात्रतेच्या गुन्ह्याकरिता फाशी देण्यासाठी काळी टोपी चढवून सर्व परकी मुत्सद्दी व वावदूक तयार झाले असता त्याचा बचाव करण्याला स्वतः हिंदी मुत्सद्याना वकील म्हणून उभे राहण्याला लाज वाटावी व शिष्टाईचे पीठ सोडून त्यानीच न्यायपीठावर जाऊन बसण्याची हाव धरावी. मात्र त्याना स्वतःला व्यक्तिशः देण्याला वाटेल तितका मोठा अधिकार सरकाराने पुढे केला तर त्याला ते स्वतः मात्र पात्र ठरतात ! पंचतंत्रातील गोष्टीत वाघाच्या बच्च्याला चुकून आपले रूप पाण्यात पहावयास सापडल्याने आपण वाघच आहो असे प्रत्यभिज्ञान त्याला झाले. पण हिंदी लोकाना खरे रूप पाहण्याला निश्चळ पाणीच मिळत नाही. आणि प्रत्येक नवा परीक्षक येतो तो स्वार्थाने 'तूं वाघ नाहीस' असेच सागतो. सर सत्येंद्रसिंह यानी आपल्या भाषणात हिंदुस्थानची स्थिती पोलादी काटेरी पिंजऱ्यात बांधून टाकलेल्या पायमोडक्या पोपटाप्रमाणे झाली आहे असें वर्णन केलें. पण त्याचे दार उघडून दुसरा कोणी देत नाही,. अध्यक्षासारखे लोक हे दुःख सोशीत पिंजऱ्यातच बसले पाहिजे असे सांगतात, आणि आमच्यातलेच काही लोक परतंत्रतेचा अनुवाद करतात. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेत दोन पोपटांचे संभाषण दिले आहे. स्वैरसंचार करणारा पोपट बंदिवान पोपटाला म्हणतो, कारागत तू कसे पसरिसी पंख पंजरागारी ! बंदिवान पोपट उलट त्यालाच विचारतो अतल रागन हे पद ठेविसि तूं कैसे शून्याधारी १ असो. मुंबईच्या काँग्रेसनंतर नेमस्तापैकींच काही गृहस्थ हणजे चिंतामणी गोविंदराघव अय्यर व नागपूरचे पंडित हे पुण्यास आले व त्यात त्यांनी किर्लोस्कर