पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० लो० टिळकांचे चरित्र भाग ९ उपदेश करील, कोणी सामाजिक सुधारणेविषयी कळकळ दाखवील, कोणी प्रार्थना- समाज व ब्रह्मोसमाज काढून निर्लेप ईश्वरपूजा व ईश्वरभक्ति यांचे सप्रमाण सम- र्थन करील. तथापि हिंदुत्वाचा अभिमान धरून हिंदुधर्माच्या भूमिकेवर या नवीन विचारांची कलमे करून उदार व उदात्त विचार तर घ्यावयाचे पण हिंदुधर्माची ओळख स्वतःच्या व जगाच्या दृष्टीने घालवू द्यावयाची नाही ही गोष्ट आचार्यपीठांना कळून चुकली होती. तथापि दुसन्या बाजूला प्रत्यक्ष आचाराचा संबंध आला म्हणजे टिळकावरहि फिर्यादी व ग्रामण्ये होत आणि यांचा निकाल लावण्याची वेळ आली म्हणजे आचार्यपीठांना ते एक मोठे संकट वाटे. फिर्याद आली की तिची चौकशी केलीच पाहिजे व टिळकाविरुद्धहि निकाल दिला पाहिजे. पण टिळकाना आपले म्हणणे खरे वाटले तर ते त्याकरिता जसे सरकाराशी तसे धर्मगुरूशीहि झगडण्यांत कमी करणारे नव्हते. एखाद्या राजाकडे त्याच्या आवडत्या सरदाराविरुद्ध फिर्याद जाऊन न्याय करण्याचा प्रसंग आला असता तो जसा घोटाळ्यात पडेल तशाच घोटाळ्यात आचार्यपीठेहि टिळकांच्या बाबतीत पडत. लोकावरील आपले वर्चस्व जात चालले आहे हे धर्मगुरूना उघड दिसत होते. तथापि काही जुने राखावे काही नवे करावे असे दुहेरी धोरण कोणाला स्वीकारावयाचे झाल्यास ते टिळकांच्या मदतीशिवाय पार पडणार नाही व ते पार पडूनहि आपले वर्चस्व राहावयाचे ते टिळकांच्या चतुर सल्लामसलतीशिवाय होणार नाही असे त्यांना वाटू लागले होते. पुढे काही काही धर्मनिर्णयाच्या कामी आचार्यानी मंडळे नेमली त्यांत टिळकाना नेमले होते. परंतु प्रथम प्रथम टिळ काना या आचार्यपीठापुढे प्रतिवादी किंवा आरोपी म्हणून जाण्याचे प्रसंग अधिक आले. चहाप्रकरणातील ग्रामण्याची हकिकत या चरित्रग्रंथाच्या पहिल्या भागांत दिलीच आहे. परंतु त्या ग्रामण्याचे शेपूट अजून उरलेच होते. ते १९०४ व १९०६ साली लग्नमुंजीच्या अक्षतीच्या बाबतीत पुनः उमटले. पुण्यातील एक गृहस्थ विनायक नारायण जोशी यानी १९०४ साली अर्ज केला की टिळकावर पूर्वीचे ग्रामण्य शिल्लक असता त्यांच्या मुलाच्या मुंजीची अक्षत देवळात गेली यामुळे गावात घोटाळा जास्त झाला. तरी त्याची चौकशी होऊन बखेडा मोडून प्रकरणाचा निकाल लावावा. या अर्जावरून शंकराचार्यांनी टिळकाना जाब विचा- रला. त्यात त्यानी उत्तर दिले की मजवर निग्रह मुळीच शिल्लक नाही. अक्षती- मुळे गावात बखेडा झालेला नाही. आणि हल्लीचे वादी हे पूर्वीच्या ग्रामण्यात पक्षकार नसल्यामुळे जुन्या प्रकरणातील पक्षकार नातू व खाजगीवाले याना नोटीसा काढून विचारण्यात यावे. त्याप्रमाणे नोटिसा निघून तीन शास्त्र्यांचे एक न्याय- मंडळ व त्यांच्या मदतीला खेडचे गोळे वकील अशा नेमणुका करण्यात आल्या. त्यापुढे सुनावणी सुरू झाली तेव्हा जोशी यानी अर्ज केला की हे काम खुद्द श्रीपुढे चालावे, या मंडळापुढे चालू नये. त्यावरून एक दिवसाची मुदत दिली.