पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ सामाजिक व धार्मिक ३९ कधी मुसलमानी थाटाचा लोटा एकाने पुढे केला तो घेऊन ते पाणी प्याले. इतक्यात एका भाविक शिष्याला अशी इच्छा उत्पन्न झाली की साईबाबांचे उच्छिष्ट तीर्थ मंडळीना द्यावे. झाले ! तोच लोटा घेऊन उष्टावलेल्या तोटीतून प्रत्येकाच्या हाता- वर आचमन घालण्याला सुरवात झाली. हे पाहताच टिळकांच्या डोळ्यात संकट उभे राहिलेले दिसले. पण त्यांच्याने तीर्थ नाही म्हणवेना व त्यानी तोंड वाईट केलेले दिसू न देता आचमन प्राशन केले. वास्तविक टिळकाना हे टाळता आले असते इतके प्रसंगावधान त्यांच्या अंगी खचित होते. पण या ठिकाणी युक्ति मुचू- नहि ती अमलात न आणणे याचे कारण एक तर मित्राचे सान्निव्य. त्याची भावना कशी दुखवावी ? व दुसरे असे की सत्पुरुष म्हणून मानलेल्या एका व्यक्तीच्या घरी आपण उठून गेलो तेव्हा तेथे त्याचा अपमान होईल किंवा इतरांची भावना दुख- विली जाईल असे आचरण आपण करू नये असा मनाचा कल. वास्तविक कोणाला तोडून बोलावयाचे तर टिळकांच्या तोंडात व हातात कात्री नेहमी सज्ज व पाजळलेली असे. पण " घनगर्जिताप्रमाणे डुरकणारा सिंह देखील भावनेने किंवा भिडेने कबूतराप्रमाणे स्निग्ध आवाज काढतो आणि त्याचा स्पष्ट शब्दहि बाहेर कोणाला कळत नाही इतका तो खोल घुमतो " अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे तिची प्रतीती जुन्या संस्कृतीशीच काय पण जुन्या संस्कृतीच्या विकृतीशीहि बागताना टिळकांची आढळून येत असे. तात्पर्य, धार्मिक म्हणून समजल्या जाणाऱ्या आचरणाच्या बाबतीत त्यानी नित्यक्रमाविषयी स्वतःला व्यक्तिस्वातंत्र्य हक्काने ठेवून घेतले होते, तथापि दुसऱ्याचा हकहि ते तितक्याच प्रांजळपणाने मानीत. एवढेच नव्हे तर या दोन हक्कांच्या सरहद्दी एकमेकात घुसत असत तेथे अंगुळ- भर जागा दुसन्याला झुकती देऊन ते सरहद्दीचा तंटा मिटवून घेत व कचित प्रसंगी स्वतःच्या हक्कापेक्षा सात्त्विक शेजारधर्माला अधिक महत्त्व देत. बाबा पटवर्धन लिहितात की " माझ्या वडिलांच्या स्नानसंध्येसंबंधाने गोष्टी सहज निघाल्या म्हणजे टिळक थट्टेने म्हणत की या बाबतीत आमच्या वाटण्या झाल्या आहेत. त्यानी स्नानसंध्या करून राजकारण करावे व मी लोकजागृति करून राज. कारण साधावे. " आणि ही वाटणी खरीच होती. गणपती उत्सवाला राष्ट्रीय हे सर्वसाधारण नाव आहे. पण अण्णासाहेब पटवर्धन या उत्सवाकडे त्यातल्या त्यात धार्मिक दृष्टीने पाहात व टिळक त्याच उत्सवाकडे लोकजागृतीच्या दृष्टीने पाहात. टिळक व धर्मगुरूंची पीठे यांचा संबंध एकंदरीने पाहता मोठ्या गुंता- गुंतीचा होता. एका बाजूने या पीठाना ही गोष्ट स्पष्ट दिसून येत होती की सना- तन धर्माचा अभिमान धरून त्याचा पुरस्कार करणे या बाबतीत टिळक व केसरी यांची मदत सर्वश्रेष्ठ आहे. इतर धर्माचे इल्ले परतविणे व हिंदुधर्मांचे वैभव इतरांपुढे प्रगट करणे ही गोष्ट टिळक जितक्या विद्वत्तेने व तीव्रतेने करितात तितके इतर कोणीहि करीत नाही. सुशिक्षितांच्या नवीन पिढीत विद्वत्ता विचार विवेक असला तरी हिंदुत्वाचा असा अभिमान थोडा. कोणी विश्वबंधुत्वाचा