पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ टिळकांच्या घरी पडलेला पुष्कळाना माहित आहे. व एका साधूच्या सामानात तर मदिरेची एक बाटली होती किंवा कदाचित् त्याची तलफ एरवी भागत नाही म्हणून तो आल्यावर बाहेरून त्याला कोणी पुरविली होती. कसेही असले तरी आपल्या सुधारक स्नेह्यांच्या ज्या गोष्टी टिळकानी घरी चालू दिल्या नाहीत तसल्या गोष्टी त्यानी अशा या लोकांच्या चालू दिल्या. पण खरे व मोठ्या योग्यतेचे असे महंत साधुसंत किंवा यति ब्रह्मचारी टिळकांच्या घरी येऊन कधीच उतरत नसत. त्यांची यांची भेट स्वतः त्यांच्या निवासस्थानी किंवा इतर कोठे प्रसंगोपात्त पडे. घरी येत किंवा उतरत अशापैकी काही, इतर चार लोकांच्या कौतुकाप्रमाणे, टिळकानाहि आपल्या भेटण्याबोलण्याचे कौतुक पुरवण्याकरिता येत, तर काही टिळकांच्या पुढे साधुपणा मिरविण्यास येत. पण त्यानी यांचे वैभव पाहिले यानी त्यांचे वैभव पाहिले याखेरीज या भेटीतून काही अधिक निष्पन्न झाले असेल असे वाटत नाही. कारण खुणेच्या अशा गोष्टी परस्परांच्या वेगळ्याच होत्या. एखादा भोळा मनुष्य त्याना धर्माचरणाचा उपदेश करी. कोणी अनुष्ठानाचे महत्त्व गाई. कोणी खऱ्या मनाने काही जडीबुट्टी किंवा प्रसाद देई. त्या सर्वांचा स्वीकार ते त्यांच्या समाधानाकरिता करीत. उलट चालू युगातील मनुष्याचे खरे कर्तव्य काय लोकसंग्रह कसा करावा या गोष्टीहि अशा- पैकी कोणी समंजस दिसला तर टिळक त्याला सांगत. एकादा भाविक मनुष्य येऊन सांगे की तुमच्याकरिता मी अमुक उपासना केली अमुक अनुष्ठान केले तर त्याविषयी ते कृतज्ञता दाखवीत. पण एकादा अहंमन्य असादि भेटे व त्याना सांगे की तुम्ही तुरुंगात असता निराश व उदास झाला तेव्हा आपल्या योगबलाचे सामर्थ्य मी तुमच्याकडे मानसिक व आध्यात्मिक विद्युत्ाक्तीने पाठवीत होतो ! पण त्याचाहि त्यानी कधी उes अपमान केला नाही. फार तर दासून तुच्छता दाखवीत. अशा कामी टिळ- कांच्या अंगी इतका भिडस्तपणा होता की त्यांचा नेहमीचा तापट स्वभाव माहित असणाराला त्याचे आश्चर्यच वाटेल. दुसरा एक प्रसंग विशेष सांगण्यासारखा घडला. तो असा. १९१७ साली नाशिक येथील परिषदेनंतर टिळक मोटारीतून संगमनेरकडे येण्याला निघाले. वाटेत काही अंतरावर शेरडी हा गाव लागतो व दादासाहेब खापर्डे हरी सिताराम दिक्षित वगैरे मंडळी साई महाराजांच्या सन्निध येऊन राहिली होती. खापर्डे यांच्या भेटीकरिता म्हणून टिळक वाकडी वाट करून शेरडीला गेले. साईमहार - जाकरिता म्हणून ते गेले नसते हे निश्चित आहे. तेथे गेल्यावर साईमहाराजानी नित्यक्रमाप्रमाणे टिळकांच्या जवळ दक्षिणा मागितली व दिली ती थोडी म्हणून आणखी मागितली. तीहि टिळकांनी उसनी घेतली पण दिली. साईबाबांचा अंगारा त्याना कोणी लावला व प्रसाद म्हणून फुलांची माळ व नारळ दिला तेहि त्यानी घेतला. पण याहून कठिण असा एक प्रसंग तेथे टिळकावर आला व त्यात त्यांच्या भिडस्त स्वभावाची परीक्षा झाली. टिळक साईमहाराजांचा निरोप घेण्यास गेले असता साईबाबानी तहान लागली म्हणून पाणी मागितले. तेव्हा तोटी असलेला