पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ सामाजिक व धार्मिक ३७ की काही एका मर्यादेपलकिडे ठराविक धर्माचरण करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. मग त्याचा फायदा किती व तोटा किती हा हिशेब त्यानी आकडे मांडून कधी केला नाही. 3 स्नानसंध्यादि कर्मे देवदेवतार्चन उपासना या गोष्टी चित्तशुद्धीला उपयोगी पडणाऱ्या आहेत हे त्याना माहित असल्यामुळे यथोचित स्नानसंध्या करणाराची त्यानी केव्हा थट्टा किंवा निंदा केली नाही, पण चित्तशुद्धीचा तो एकच मार्ग आहे ही गोष्ट त्याना कबूल नव्हती. आणि चित्तशुद्धीचे आपले मार्ग आपल्या पसंतीने स्वीकारण्याचा हक्क प्रत्येकाला आहे व असावा असे त्यांचे मत होते. "प्रत्युपकाराची इच्छा न ठेवता परोपकार करण्याच्या सवईने फार लवकर चित्तशुद्धि होते व मला हा मार्ग पसंत असल्यामुळे मी त्या मार्गाने जात आहे. "असे ते म्हणत. या मार्ग- संशोधनात इतरांचा हक्क जसा ते मानीत तसा त्यांचा हक्कदि मान्य करणे इतराना प्राप्तच आहे. आता आपल्याकडे कमीपणा घ्यावा याकरिता ते म्हणत की 'मी अनुसरितो तो मार्ग अधिक सोपा म्हणून मी पसंत केला आहे. पण दोहोत अधिक सोपा मार्ग कोणता हे जगात अनुभवसिद्ध असल्यामुळे त्याविषयी आम्ही काही लिहीत नाही ! पण स्वतः स्वीकारलेला मार्ग कोणताहि असला तरी लोकांच्या दृष्टीने कर्मठपणालाच अधिक किंमत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तसा प्रसंग आल्यास टिळक धार्मिक समारंभात कर्मठ लोकानाच अग्रमान देत व देववीत. एकदा कोठे मूर्तीची स्थापना करण्याचा प्रसंग आला तेव्हा त्याना कोणी विनंति केली की " हा समारंभ तुमच्या हस्ते व्हावा अशी इच्छा आहे. " तेव्हा टिळकानी सांगितले की " समारंभ लौकिक स्वरूपाचा असता तर मी नाही म्हटले नसते. पण या समारंभाला जुन्या पद्धतीचे धार्मिक स्वरूप आहे म्हणून तो कर- याला मी योग्य नाही. प्रत्येक कामाला योग्यता वेगवेगळ्या प्रकारची लागत असते. " त्यांच्याकडे कोणीहि साधूसंत वैरागी यति ब्रह्मचारी किंवा यात्रेकरू आला तरी जुन्या धर्मपद्धतीचा व धर्म भावनेचा तो एक प्रतिनिधि या नात्याने टिळक त्याला योग्य तो मान देत. कित्येक बुवाजी खुशाल त्यांचे घरी येऊन पाहुणे म्हणून राहात आणि कित्येकांचा उपद्रव दुःसहहि होई. पण त्यांचाहि अपमान त्यानी केला नाही किंवा त्याला आठमुठेपणाने घालवून दिले नाही. कित्येक उपद्रवी असत ही गोष्ट मुळीच खोटी नाही. एक साधुबुवा येऊन राहिला त्याचा नियम असा होता की आपल्या हाताने जेवावयाचे नाही. त्याला अवि- वाहित मुलीनेच भरविले पाहिजे ! टिळकांच्या घरची अविवाहित मुलगी नव्हती. असती तर तीहि बिचारी कंटाळती. व बाहेरून रोज नवी कुमारिका साधुबुवाला भरविण्याकरिता कोठून पैदा करावयाची ? दुसरे कित्येक असे असत की घरात आपल्या आधी कोणी जेवलेले त्याना खपत नसे आणि त्यांची लहर लागेल त्या- प्रमाणे आन्हिक आटोपून मग ते जेवावयाला यावयाचे. पण शाळेत जाणारी मुले असणाऱ्या घरी हे कसे निभणार ? गांजा ओढणाऱ्या एका साधूचा मुक्काम