पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ सामाजिक व धार्मिक ३५ मंत्र कधी जपला नाही. धर्मग्रंथाचे वाचन त्यांचे हातून होई. पण ते देव- घरात आसनावर बसून कधी झाले नाही, तर ते इझी चेअरवर बसून सुपारी खात खात किंवा चार लोकाशी लौकिक गोष्टी बोलत बोलत. गावात तुळशीबागेत किंवा बेलबागेत किंवा पर्वतीला देवदर्शनाकरिता म्हणून ते कधी गेले नाहीत. आणि रस्त्यातून जाता येता एखाद्या देवाच्या अंगावरून ते गेले तरी ते हटकून थांबून पायातील जोडे काढून ठेऊन हात जोडून वंदन करतील अशीहि कोणी अपेक्षा केली नाही. अण्णासाहेब पटवर्धनाप्रमाणे त्यानी देवाला किंवा पिंप- ळाला प्रदक्षणा घातल्या नाहीत. प्रार्थना समाजिस्ट माधवरावजी रानडे यांच्याप्रमाणे त्यानी पहाटे उठून चिपळ्या घेऊन तुकारामाचे अभंग कधी गाईले नाहीत. एखाद्या व्यासपीठावर बसून धार्मिक पुराण प्रवचन कधी केले नाही. ईश्वरभक्तिविषयी कधी उपदेश केला नाही व स्वतः मुक्तकंठ प्रार्थना म्हटली नाही. पण टिळकानी काय गोष्टी केल्या नाहीत हे जसे सांगितले तसेच काय काय गोष्टी केल्या हेहि निश्चयात्मक सांगता येते. आणि त्या अशा की त्यानी हिंदुधर्माचे संस्कार पाळण्याची व्यक्तिनिष्ठ किंवा कौटुंबिक धर्मकृत्ये सर्व केली. घरात बाय- कोच्या समाधानाकरिता पाचवी पुजण्यासारखी धर्मकृत्ये त्यानी करू दिली आणि केव्हा केव्हा षष्ठीपूजन स्वतः केले. मौंजीबंधन लग्नविधी हे मंगल संस्कार जसे ते यथाविधि करीत तसेच श्राद्धपक्ष किंवा और्ध्वदेहिक असली धर्मकृत्ये ते करीत. आईबापांच्या और्ध्वदेहिकाचे वेळी त्यानी सक्षौर विधि केले. आणि ग्रामण्य झाले तेव्हा प्रायःश्चित्त घेतले. मुलानी कोणत्या वयापर्यंत काय धर्म-कृत्ये करावी याविषयी टिळकांची कल्पना काय होती हे त्यांचे जावई केतकर यानी एका आठ- वणीत सांगितले आहे. ते म्हणतात " वाड्यात आम्ही मंडळी भोजनास बसलो असता शेजारी बसलेल्या तरुण मंडळीस उद्देशून टिळक म्हणाले, अरे आज संध्या कोणी कोणी केली आहे ? संध्येला प्रत्येकाने टाळा दिला असल्याकार- णाने जो तो दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहू लागला. हे पाहून लोकमान्य म्हणाले मी स्वतः रोज संध्या करीत नसलो तरी तुम्हाला ती इतक्यातच सोडण्याचे कारण नाही ! " या सर्व गोष्टी एकत्र विचारात घेतल्या असता सर्वसाधारणतः असा सिद्धान्त बांधिता येईल की, काही एका वयोमर्यादेपर्यंत प्रत्येक हिंदुमात्राच्या मनावर धर्माचा म्हणून काही बोज असावा याकरिता काही संस्कार व विधी त्यांच्या हातून होणे इष्ट आहे असे टिळकांचे मत असे. तसेंच काही काही गोष्टी जन्मभर करण्याच्याच आहेत, तथापि मनुष्य कितपत कर्मठ असेल किंवा नसेल हे त्याच्या स्वभावावर व भावनेवर अवलंबून राहील आणि या बाबतीत व्यक्ति- मात्राला काही एका मर्यादेपलीकडे स्वातंत्र्य असावे असेहि त्यांचे मत असे. लहानपणी वाणीवर संस्कार व्हावा म्हणून चार वेदाक्षरे प्रत्येक मुलाने म्हणावी किंवा रूपावळी समासचक्रासारखे मूलभूत संस्कृत ग्रंथ प्रत्येक हिंदुमात्राने शिकावे