पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ होते आणि जी न्याय्य हक्काची पायमल्ली करीत होते त्यासंबंधाचे होते. मुंबईचे सीताराम केशव बोले यानी आपल्या आठवणीत असे लिहिले आहे की "मी वेदोक्ताच्या बाबतीत स्वतः टिळकांकडे जाऊन चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले की " जर्मनीत छापलेले वेद जर आम्ही वाचतो तर ब्राह्मणेतरास ते वाचण्याचा व त्याप्रमाणे कर्मे करण्याचा अधिकार नाही या म्हणण्यात काही अर्थ नाही.' या उद्गारावरून सामाजिक बाबतीत टिळक उदारमतवादी नाहीत या म्हणण्यात काही अर्थ नाही. परंतु राजकीय बाबतीत लोकजागृति करण्याचा जो मार्ग आपण पत्क- रला आहे त्याला अडथळा येऊ नये या विचाराने कदाचित् त्यानी सामाजिक सुधारणेच्या बाबतीत आपल्या मताची विशेष परिस्फुटता केली नसावी. 35 धर्माचरण - सन १९०० च्या सप्टेंबर महिन्यात टिळकानी पुण्यातील गणपति उत्सवात रे मार्केटातील गणपतीपुढे भिंगारकरबुवा यांच्या अध्यक्षतेखाली 'हिंदु- धर्माचे लक्षण ' या विषयावर व्याख्यान दिले. हे व्याख्यान दीड तास चालले होते. त्यातील विषय महत्त्वाचा आणि प्रतिपादनहि अतिशय विद्वत्तापूर्ण असे झाले यामुळे सभा चित्रासारखी तटस्थ होती. या व्याख्यानाचा सारांश १८ सप्टेंबर १९०० च्या केसरीत दिला आहे तो स्वतः टिळकानी मागाहून मुद्दाम लिहून काढला. या व्याख्यानात त्यानी हिंदुधर्मलक्षणाचे वर्णन ज्या एका लहा- नशा श्लोकात केले तो श्लोक आता प्रसिद्ध असून त्यातील लक्षण प्रायः सर्व- संमत झाले आहे. तो श्लोक असाः- " प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता उपास्यानामनियम चैतद्धर्मस्य लक्षणम् ॥ 33 यावरून टिळकांची हिंदुधर्माची कल्पना किती समर्पक होती हे दिसून येईल. टिळक हे नुसते तात्त्विक दृष्टया आस्तिक नव्हते तर ईश्वरावर त्यांची निष्ठा असे. पण ईश्वर हा पुराणांतरी वर्णिलेला तसा ते मानीत नसत. तर तर्क व निष्ठा यांच्या मिश्रणाने त्यांची ईश्वराची कल्पना बनलेली होती. ही कल्पना उदात्त होती. तथापि धर्म हा राजकारण व अर्थशास्त्र यांच्याप्रमाणे राष्ट्रीय स्वरूपाचा असा व्यवहारात मानला पाहिजे असे ते समजत. हिंदु-धार्मिक आचार म्हणून जे गणले जातात त्यातील फारच थोडे टिळक स्वतः करीत. या दृष्टीने त्यांची दिन- चर्या पाहिली तर ती कर्मठ माणसाची मुळीच नव्हती. स्नानाच्या आधी खाण्या- पिण्याला प्रसंगविशेषी त्यांची हरकत नसे. स्नान करिताना त्यानी आंग स्वच्छ करण्याची जितकी काळजी घेतली तितकी स्नान करिताना तीर्थे व नद्या यांची आठवण करण्याविषयी कधी घेतली नाही. स्नान करिताना त्यांच्या तोंडून ' गंगा गंगेति यो ब्रूयात् ' हे वचन किंवा ' गंगास्तोत्रा' चे कडवे कधी आलेले कोणी ऐकले नाही. स्नानानंतर त्यानी प्रौढीने आचमने कधी टाकली नाहीत, किंवा गीतेचे पाठ कर्मठ पद्धतीने वाचले नाहीत, किंवा देवापुढे बसून एखादे फूल कधी वाहिले नाही, किंवा खरोखर ध्यानस्थ बसून एखादा गायत्री