पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ सामाजिक व धार्मिक विठ्ठलराव शिंदे यांचे टिळकाना पस पुणे २ जुलै १९१८ ३३ "ना. पटेल व मुंबई प्रां. कॉ. कमिटीचे इतर चिटणीस मला कळवितात की, स्पेशल काँग्रेसकरिता तुम्ही अस्पृश्यातर्फे काही प्रतिनिधि निवडून पाठवा. प्रतिनिधि वगैरे निवडण्यासंबंधी कॉंग्रेसचे काय नियम आहेत हे मला माहीत नाही. अस्पृश्यांच्या जाहीरसभा बोलावून प्रतिनिधि निवडले तर चालतील काय ? तसेच काँग्रेससंस्थेविषयी अस्पृश्यांच्या मनात आदर व निष्ठा उत्पन्न करण्याकरिता, मोठ- मोठ्या पुढाऱ्यांच्या सह्या असलेले एक 'अस्पृश्यतानिषेधक जाहीरपत्रक ' अशा सभातून वाचून दाखवावे असे वाटते. जाहीरपत्रक सोबत पाठविले आहे. त्यावर आपण सही दिल्यास काँग्रेसचे तसेच अस्पृश्य वर्गाचेहि हित होणार आहे. तरी कृपा करून मॅनिफेस्टोवर सही करून पाठवावी. " टिळकांचे शिंदे यांस उत्तर पुणे २ जुलै १९१८ "तुमचे पत्र पोचले. तुमच्या मॅनिफेस्टोच्या शेवटी काही कार्यक्रम शिरावर घेऊन तो प्रत्यक्ष अमलात आणण्याची व्यक्तिशः जबाबदारी त्यात टाकलेली असल्यामुळे सध्याच्या माझ्या कार्यव्यापृततेमध्ये हे नवीन कार्य मला अंगावर घेता येईलसे वाटत नाही. म्हणून तुमच्या जाहीरपत्रकावर मला सही देता येत नाही याबद्दल माफ करा. माँटेग्यू चेम्सफर्ड रिपोर्ट पाठविला आहे. त्यातील २३२ सावा प्यारा वाचा व नंतर रिपोर्ट परत पाठवून द्या. " पुण्यास नायकांच्या गणपती पुढे १९०७साली हिंदुधर्मातील एकी व सहिष्णुता 'या विषयावर टिळकांचे व्याख्यान झाले. त्यात त्यानी सांगितले की "गणपतीला अंत्यजाचा विटाळ होतो म्हणून सार्वजनिक गणपत्युत्सव नको असे म्हणणे म्हणजे माणसे ईश्वराने उत्पन्न केली नाहीत असे म्हणण्यासारखे आहे. वेदात चार वर्ण आहेत. ब्राह्मण मुखाचे ठिकाणी क्षत्रिय बाहूचे ठिकाणी वैश्य उरूचे ठिकाणी व शूद्र चरणाचे ठिकाणी आहेत असे सांगितले आहे. मग डोक्याला काय पायाचा विटाळ होतो ? की बाहूला पायाचा विटाळ होतो ? असे धरल्यास आधी डोके तोडून निराळे ठेवावे लागेल ! सर्व धर्मात हिंदुधर्माइतका सहिष्णु- धर्म सांपडणार नाही. महारमांगापासून ब्रह्मवाद्यापर्यंत सारे हिंदु या सदरात येतात. म्हणून हिंदु हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्यात एकप्रकारची ईर्ष्या आवेश उत्पन्न झाला पाहिजे. सरकार परधर्मी व समाजात फूट पाडीत आहे हे लक्षात घेऊन आपण एकी ठेवली पाहिजे.” वेदोक्ताच्या भांडणात खरे भांडण वेदाधिकाराचे नव्हते तर वेदाधिकाराचे निमित्त करून कित्येक संस्थानिक जी उच्छृंखल वृत्ति दाखवून अन्याय करीत