पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ योजना केली. महाराष्ट्रीय ब्राह्मणातील तीनहि उपवर्णात चालीरीति व गृहस्थिति ही जवळजवळ सारखी आहेत. म्हणून हे व्यवहार रूढ होण्यास फारशी अडचण नाही. as शास्त्रार्थाची नाही तर प्रत्यक्ष कृतीची आहे. शंकराचार्याकडे विनाकारण विनंतिपत्र पाठविल्यास कदाचित विरोधी किंवा संशयात्मक निर्णय मिळून उगीच पायावर दगड पाडून घेतल्यासारखी स्थिति व्हावयाची. असले विवाह करण्यास तयार असलेल्या लोकांची यादी करावी व पुढील काम चालू करावे. मोठमोठ्या घराण्यानी यात पुढाकार घेतल्यास मार्ग सोपा होईल. 'काशीस जावे नित्य वदावे' इतके म्हणण्यापुरतेच विनंतिपत्र असेल तर त्यात अर्थ नाही, " असा अभिप्राय टिळकानी या विषयावर दिला. तेव्हापासून अलीकडे या विषयात बरीच प्रगति झाली आहे. आणि सामान्य पदवीच्या सुशिक्षितानी ही सुधारणा घडवून आणली आहे इतकेच नव्हे तर मोठ्या घराण्यातील लोकानीहि ही गोष्ट अनुसरली आहे. केसरीतील या लेखाने समाजात प्रगतिपर विचार उत्पन्न झाले आणि कित्येकानी या तीन पोटजातीपलीकडेहि का जाऊ नये असा प्रश्न टिळकाना पत्रद्वारे केला. त्यावर टिळकानी पुढे एका लेखात असे उत्तर दिले की "देशस्थ कोकणस्थ कराडे यांचाच प्राधान्येकरून जरी आम्ही निर्देश केला होता तरी आमच्याकडील ज्या ब्राह्मणात अन्नव्यवहार होतो त्यांच्या दरम्यान विवाह होणे इष्ट आहे असे आम्ही पूर्वीच स्पष्ट लिहिले होते आणि त्या विधानात देवरुखे वगैरे इतर पोटजातींचा समावेश होतो हे उघड आहे. जेथे अन्नव्यवहारच होत नाही तेथेच खरी अड- चण आहे. आणि ज्या विषयी प्रत्यक्ष शास्त्रीय निषेध आहे ती बाब सोडून दिली पाहिजे. पण इतरत्र केवळ रूढिनिषेधावर अवलंबून राहणे योग्य नाही. नसत्या ठिकाणी शास्त्रनिषेधाचा अध्यारोप कोणी करू नये. शास्त्र आम्हाला प्रमाण आहे असे मानून व ते या कामी विरोधी नाही असे समजून पुढच्या मार्गाला लागावे " असे सुचवून टिळकानी हा प्रश्न तेव्हा निकालात काढला. अस्पृश्यता - टिळक स्वतः अस्पृश्यता मानीत नसत व सार्वजनिकच काय पण खासगी जागेत हि ती मानली जाऊ नये असेच त्यांचे मत असे. आणि जुन्या समाजाला दमाने घेतले तर तोहि ती काढून टाकील असे त्याना वाटत असे. ते अस्पृश्य लोकांच्या निमंत्रणावरून त्यांच्याकडे पानसुपारीला जात. तथापि अस्पृश्यानी सत्या- ग्रहाच्या दंडेलीने हा प्रश्न सोडवावा असे त्यांचे मत नव्हते. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत १९२० साली ते मुंबईस परिषदेला हजर राहिले पण त्यानी वि. रा. शिंदे यानी तयार केलेल्या एका प्रतिज्ञा पत्रकावर सही केली नाही, म्हणून त्यांची सहानुभूति ढोंगीपणाची होती असा एक आक्षेप त्यांचेवर आणण्यात येतो. पण या बाबतीत शिंदे यांचे पत्र व टिळक यांचे उत्तर ही दोन्ही खाली दिली आहेत व त्यावरून प्रतिज्ञापत्रकावर सही न करण्याचे टिळकांचे कारण कळून येईल.