पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ सामाजिक व धार्मिक ३१ मी काही पुढाऱ्यांजवळ अशा तऱ्हेच्या तडजोडीची वाटाघाट केली होती. पण तिचा तेव्हा उपयोग झाला नाही. तेव्हा असला वाद वर्तमानपत्रातून करण्यापेक्षा खाजगी झालेला बरा. आणि खाजगी रीतीने तडजोड करण्यास मी तयार आहे. समाजात पुनर्विवाहाच्या कारणाने पडलेली तेढ किंवा तंटा मिटावा अशी माझी इच्छा आहे. पण ही गोष्ट खाजगी रीतीने व्हावी एवढेच आमचे म्हणणे. " पोटजाती - ब्राह्मणातील पोटजाती मोडण्याविषयी टिळक प्रथमपासून अनुकूल होते. चिपळूणकर आगरकर वगैरे मंडळींचीहि तीच मते होती. केसरी पत्र सुरू झाल्यावर पहिल्या दोन आठवड्यातच केसरीत या विषयावर लेख आले. आणि कोकणस्थ देशस्थ कराडे यामधील विवाहाला होणारा प्रतिबंध शास्त्रसिद्ध नाही, तो व्यवहारदृष्ट्या व वैद्यशास्त्रदृष्ट्या मोडणे इष्ट आहे, असे मत प्रगट करण्यात आले. नंतर मधून मधून या विषयाचे तांत्रिक उल्लेख केसरीतून होत असत. १८८८ साली सोलापुरास शृंगेरी येथील जगद्गुरु असता त्यांच्यासमोर या विष याची चर्चा झाली. तीत या तीन पोटजातीतील विवाहाना हरकत नाही असेच निष्पन्न झाले. सामाजिक परिषद सालोसाल या विषयावर ठराव करीतच होती. सन १९०० च्या नोव्हेंबर महिन्यात सातारच्या पुढाऱ्यानी या कामी उचल केली, आणि रामशास्त्री गोडबोले या प्रसिद्ध शास्त्र्यासह चाळीस पन्नास गृहस्थानी संकेश्वरच्या जगद्गुरूना एक विनंतिपत्र पाठवून या सुधारणेला त्यानी संमति द्यावी असे लिहिले. या विषयावर केसरीत दोन अग्रलेख लिहून टिळकानी आपला स्पष्ट अभिप्राय पुन्हा एकवार दिला. “मिळणारी सर्व माहिती व आधार लक्षात घेता या विवाहाना विरोध करण्याला शास्त्रात कोठेच आधार नाही. सूत्रकालापासून पुराणकालापर्यंत विवाहविषयक वचनात ब्राह्मणातील पोट- जातींचा कोठेच उल्लेख नाही. इतकेच नव्हे तर ब्राहाणाला पूर्वकाली तिन्ही वर्गातील कन्या ग्राह्य होत्या, मात्र अनुलोम विवाहाची संतति ब्राह्मण जातीत पडत असे इतकेच. "सवर्णेभ्यः सवर्णासु जायंते हि सजातयः " या स्मृतिवचनात फक्त स्थूल वर्णाचा उल्लेख आहे. आता रूढि उलट पडली असेल पण एकाला रूढी पाडता येते तशी दुसऱ्याला दुसरी पाडता येते. रूढी बदलण्याला प्रायश्चित्त नाही. फक्त समाजातील काही लोक टीका करतील पण ती सोसली म्हणजे झाले. प्रत्येक पोटजातीला इतरानी काही तरी नाव ठेवावे अशामुळे आणि मुख्यतः दळणवळण कमी असल्यामुळे परस्पर लग्नव्यवहार मागे पडला याहून निषेधाला दुसरे कारण नाही. प्रतिबंधक रूढी देखील सार्वत्रिक नाही. फक्त रूढींचे दडपण मनावर असणारा मनुष्य नकार देण्याला काही तरी सबब सांगतो. पोटजातीतील विवाह आणि पुनर्विवाह यामध्ये तत्त्वाचा पुष्कळ भेद असून शास्त्र व तारतम्य यांचाहि भेद आहे. सातारकरांची चूक इतकीच की, त्यानी अल्पसुधारणेच्या मागे फार व्यापक असा हेतु लावला, व एकंदर जाती मोडून त्यामध्ये सरास रोटी- बेटीव्यवहार व्हावा असेहि अनुमान ज्यातून कदाचित काढता येईल अशी शब्द-