पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग २ अनुकूलतेची भरती भाग २ रा [ सन १९१६ ] (१) अनुकूलतेची भरती १९१५ च्या डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासूनच केसरीत हिंदी स्वराज्य- संघावर अग्रलेख लिहिण्याला सुरवात झाली होती. व सर्व डिसेंबर महिनाभर ही लेख- माला चालू होती. या लेखमालेत साधारणतः कोणत्या विचाराचे प्रतिपादन करण्यात आले असेल याची वाचकाना कल्पना असल्यामुळे आणि पुढे हिंदी स्वराज्यसंघाच्या हकिकतीत हा थोडा भाग येणार असल्यामुळे त्याविषयी माहिती देऊन आम्ही येथे जागा अडवीत नाही. पण १९१६ च्या प्रारंभापासून आपल्या तक्रारी बहु- तेक दूर झाल्यामुळे राष्ट्रीय सभेत तर जावयाचेच पण त्याबरोबर इकडे होमरूलची चळवळ देखील चालू ठेवावयाची असे सजोड धोरण टिळकानी ठरविले. मंत्र- ईचा ठराव एकच पण तीन्ही पक्षाना तो जवळ जवळ सारखाच मान्य झाला. नेमस्त म्हणाले " पुढच्या वर्षापर्यंत आता राष्ट्रीय सभेत होमरूल लीगचे नाव ऐकू येणार नाही. जवळ जवळ प्रतिज्ञापत्रकाचे शब्द घेऊनच स्वराज्याचा ठराव रचला गेला. बेझंटबाईंची उपसूचना नामंजूर झाली. स्वराज्याची योजना करण्या- करिता ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीला हुकूम दिलेला आहे तथापि तिजकडून ती घटना लौकर तयार होण्याची आशाच नको. " इकडे बेझंटबाई मनात म्हणाल्या की " माझी उपसूचना फेटाळली पण स्वराज्यविषयक योजना करण्याचा हुकूम झाला. आता मी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मागे लागून आपले काम करून घेईन." अँग्लो-इंडियन पत्रे म्हणोत की 'बाईच्या होमरूलं लीगच्या होडीवरचे निशाण नेमस्तानी काढून टाकले. ' पण ते निशाण मी आता त्यांच्या जहाजावरच फडकवावयास लावीन. प्रांतानिहाय काँग्रेस कमिट्या स्थाप- ण्याची आज्ञा झाली आहे. अर्थात् तिचा फायदा त्यातल्यात्यात जे अधिक उद्योग- प्रिय असतील त्यानाच मिळेल.” बाईच्या उपसूचनेत हिंदी लोक स्वराज्यास लायक झाले असल्याविषयी जो मुद्दा होता तो लोकाना विशेष चित्ताकर्षक वाटला व त्याची चर्चा यापुढे सुरू झाली. निदान आपल्याच लोकानी आपणाला अपात्र ठरवू नये. अँग्लो-इंडियन ते काम करीतच आहेत. या मुद्दयाला उद्देशून ता. १८ जानेवारी १९१६ च्या अंकात केसरीने लिहिले की 'स्वदेशाच्या स्तुतीत न्यायबुद्धि असण्यापेक्षाहि आत्मप्रीति अधिक प्रबळ पाहिजे. आणि सगळ्या जगभर हेच दिसून येते. पण आमच्यातील हिंदी लोकच आपण मनुष्य कोटीत नसून अतिमानुष कोटीत आहोत असा बहाणा करतात. आणि न्यायाशिवाय दुसरी दृष्टीच ते ओळखीत नाहीत. व्यवहारामध्ये सरकारी न्यायाधीशसुद्धा सरकारी काम टि० उ...५