पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० लो. टिळकांचे चरित्र भाग ९ जर वागतील तर त्यांच्या व लोकांच्या दरम्यान परवाप्रमाणे लढा पडणार नाही असे आम्हास वाटते, परंतु पुनर्विवाह पक्षाचे समर्थन करणे ज्यांच्या हाती पडले आहे त्या मंडळींची भिस्त शास्त्र रूढि आणि सौजन्य यापेक्षा कायदा आणि पोलिस यावर जास्त असल्यामुळे 'मुखमस्तीति वक्तव्यं ' या न्यायाने त्यानी वाटेल बडबडण्यास सुरवात केली आहे. स्वतः रा. ब. कोल्हटकर याना ही गोष्ट संमत नसल्याचे त्यानी आपल्या आचरणानेच दाखविले आहे व त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण शास्त्र व आचार यांची ओखळ नसताना तत्पक्षीय तरतरीतांच्या वर्तनाबद्दल आम्हास खेद वाटल्यावाचून रहात नाही. " केसरीच्या या उद्गारानी पुनर्विवाह पक्षाचे बरेच समाधान झाले. त्याचे पुण्यातील अध्वर्यू रामचंद्र भिकाजी जोशी यानी केसरीला पत्र लिहून कळविले की "टिळकांचे उद्गार मोठ्या उदारपणाचे व सध्याच्या देशकालवर्तमानाचा पोक्त विचार करून काढलेले आहेत यात शंका नाही. यासाठी पुनर्विवाह पक्षातील सर्व मंडळीच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो. " ते पुढे म्हणतात " जो इतका वाद माजला त्याचे कारण एकतर ही अगदी नवीन गोष्ट होय. आणि शिवाय आरंभापासून दोन्ही पक्ष अभिमानाला पेटले होते. पुनर्विवाहाची सुधारणा कर- णारानी लोकाना खिजवू नये हे खरे. पण त्याचप्रमाणे त्याना जातिभ्रष्ट धर्मभ्रष्ट ही नावेहि कोणी ठेऊ नयेत. शास्त्र व आचार न कळणाऱ्या लोकांची तरतरी जशी बाधते तशीच शास्त्र व आचार यांची ओळख असणाऱ्यांचे औदासिन्य व मौनवृत्ति याहि सुधारणेला बाधतात " जोशी यानी टिळकाना असा उलट अहेर केला. पण मुख्य गोष्ट टिळकानी केसरीत लिहिली ती जोशी यानी कबूल केली. पुनर्विवाहमंडन पक्षाने देखील पुनर्विवाह हा योग्यतेने प्रथम विवाहाच्या बरोबरीचा आहे असे म्हटलेले नाही. विष्णुशास्त्री पंडितांच्या पुस्तकाच्या १० व्या अध्यायात असे लिहिले होते की बिजवरापेक्षा जसा प्रथम वर अधिक प्रशस्त त्याचप्रमाणे विधवेपेक्षा प्रथम विवाहाची पत्नी अधिक प्रशस्त होय. ही कबूली देऊन जोशी यानी टिळकाना अशी विनंति केली की "आपण संथपणाने व पोक्तपणाने जी तडजोडीची दिशा दाखविली ती पूर्वीहि दाखविली असती तर फार चांगले झाले असते. किंवा यापुढे दाखवाल तर तंटा मिटेल.” जोशी यानी विशेष विनंति एवढीच केली की, बालविधवेचा विवाह प्रौढविधवेच्या विवाहा- इतका शास्त्रनिषिद्ध मानला जाऊ नये. या पत्रावर टिळकानी फिरून उत्तर दिले. "पण आता वाद फार थोड्यावर आला होता.” टिळकांचे म्हणणे असे की, "विष्णु शास्त्री पंडिताप्रमाणे विठोबा अण्णा दप्तरदार यांचाहि अभिप्राय पुनर्विवाहाला फारसे निषिद्ध न मानणारा पण पुनर्विवाहाला दुसरी प्रत देणारा असा होता. पुण्यास जेव्हा पुनर्विवाहाचा वाद झाला तेव्हा तडजोडीची दृष्टि कोणीहि ठेविली नव्हती. एका पक्षाचे म्हणणे हा विवाद बावनकशी सोन्याप्रमाणे शुद्ध व इष्ट आहे. अर्थात दुसरा पक्ष दुसऱ्या टोकाला गेला असल्यास नवल नाही. इल्लींच्या पूर्वी ५-७ वर्षे