पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग सामाजिक व धार्मिक २९ मोडण्याच्या उद्योगास प्रवृत्त झालेले, अशा सरमिसळ समाजात आगरकरांच्या केवळ सुधारणातत्वांचा जयजयकार करण्यात यावा यात काही नवल नाही. ज्याना बाकीच्या बाबती पहावयाच्याच नव्हत्या त्यास सगळा आगरकर नको होता. किंव- हुना तो त्यांच्या पचनीहि पडला नसता. म्हणून गोपाळरावाजींच्या चरित्रापैकी आपणास पचेल तेवढाच भाग घेऊन त्यानी गोपाळरावांची श्राद्धतिथि त्यांच्या एकविसाव्या वर्षी साजरी करून घेतली. " पुनर्विवाह - सन १९०३ च्या जून महिन्यात पुण्यास रावबहादुर वामनराव कोल्हटकर यांच्या मुलीचे लग्न झाले. ही मुलगी वामनरावजींच्या पुनर्विवाहित स्त्रीपासून झालेली असल्यामुळे अशा अपत्यांचे लग्नसमारंभ कसे काय होतात याकडे सहजच लोकांचे लक्ष लागते. त्यांचा विशेष गाजावाजा न करता ते झाले तर त्याना प्रति- बंध होत नाही व पानसुपारीला जेवणाखाणाला एरव्ही यावयाचे ते लोक येता- तच. पण क्रिया व प्रतिक्रिया या नियमाने काही एका विशेष हेतूने या लग्नाचा पुण्यात गाजावाजा करण्यात आल्यामुळे त्याला किंचित् प्रतिकारहि झाला. प्रति- कार म्हणजे तरी एरवी कोणीच काही अडथळा केला नाही, तथापि लग्नाच्या अक्ष- तीची मिरवणूक निघाली ती कसव्याच्या गणपतीपाशी गेली तेव्हा तेथील पुजा- यानी दरवाजे लावून घेतले. मिरवणूक न काढता अक्षत गेली असती तर हा प्रतिबंध झाला नसता असे दिसते. पण मिरवणूक काढली. ती गणपतीच्या निमि- ताने नव्हे तर पुनर्विवाहपक्षाचा तो जयोत्सव म्हणून काढली, आणि एका उत्साही गृहस्थाने त्याहि पलीकडे जाऊन थोडा अव्यापारेषु व्यापार केला. यामुळे प्रति- पक्षासहि जोर आला. स्वतः टिळकाना या लग्नाच्या पानसुपारीला आमंत्रण होते पण ते त्या दिवशी न जाता दुसरे दिवशी स्वतंत्रपणाने गेले. या संबंधाने केसरीत स्फुट लिहून टिळकानी आपले म्हणणे खुलासेवार मांडले आहे. ते लिहितात:--- पुनर्विवाह शास्त्रनिषिद्ध आहे असे आमचेच नव्हे तर या विषयाचे ज्यानी चांगले अवलोकन केले आहे अशा आमच्या बन्याच संस्कृतज्ञ मित्रांचेहि मत आहे. तथापि ज्यानी पुनर्विवाह केला ते ब्राह्मण्यापासून कायमचे भ्रष्ट होतात असे आम्हास वाटत नाहीं. शास्त्राने सप्रवरांचा विवादहि निषिद्ध आहे. पण अशा विवाहांची संतति ज्याप्रमाणे ब्राह्मणात गणली जाते त्याप्रमाणेच पौनर्भव संततीहि मानण्यास काही हरकत दिसत नाही. पुनर्विवाद सशास्त्र समजा की अशास्त्र समजा, जेथे जेथे तो प्रचलित आहे तेथे तेथे पहिल्या विवाहापेक्षा त्याची योग्यता कमीच समजतात. फार लांब कशाला कोल्हटकरांचेच घरी लग्नाकरिता स्त्रियांचा जो समूह गोळा झाला होता त्यातहि पुनर्विवाहित स्त्रिया व प्रथम विवाहित स्त्रिया असा भेद काही प्रसंगी करण्यात आला असे समजते. सारांश पुनर्विवाह शास्त्रनिषिद्ध असून पुनर्विवाहित लोक आणि त्यांची संतति पुनर्विवाह न करणारे लोक व त्यांच्या संततीपेक्षा जातीने जरा कमी आहेत असा लोकांचा समज असल्यास त्यात काही चूक नाही. ही वस्तुस्थिति लक्षात आणून व कबूल करून पुनर्विवाह पक्षाचे लोक