पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ व आगरकराना केसरी का सोडावा लागला हे विशद करून सांगताना टिळक लिहि- तात. " मतभेद धार्मिक आणि सामाजिक बाबतीत उत्पन्न झालेला होता. धर्मदृष्ट्या आगरकर केवळ बौद्धिकवादी होते आणि तोच पंथ सामाजिक बाबतीतहि निदान पक्षी आपल्या लेखात त्यानी स्वीकारलेला होता. आगरकरांची ही पद्धत टिळकांसच नव्हे तर त्यांचे जे दुसरे मित्र केसरीच्या चालकवर्गात होते त्यासहि पसंत नव्हती. व त्यामुळेच अखेर केसरीतून निघून गोपाळरावजीस 'सुधारक' काढावा लागला. सुधारणा नको असे केसरीचे म्हणणे केव्हाहि नव्हते. पण केवळ बौद्धिक दृष्ट्या किंवा तर्कदृष्ट्या सुधारणेचा विचार करण्यास केसरी तयार नव्हता. अर्थात् हीच पद्धत स्वीकारणे असल्यास आगरकरांस दुसरे वर्तमानपत्र काढणे जरूर होते व ते त्यानी काढले. सुधारणांचा केवळ तर्कदृष्ट्या विचार करणे योग्य नाही हे मत आता सुधारलेल्या राष्ट्रांतहि ग्राह्य झालेले आहे. राजकीय बाबतीत राज- सत्तेच्या अस्तित्वामुळे केवळ तर्कवश होऊन लिहिता येत नाही असा आगर- करांसहि अनुभव आलेला होता. पण हिंदू-समाज अधिकारहीन आणि पंगू असल्यामुळे तशा प्रकारचा अनुभव सामाजिक बाबतीत सध्या आमच्याकडे येत नाही. तथापि तेवढ्यामुळे प्राचीन परंपरा देशकाल किंवा सद्यःकालीन सामाजिक परिस्थिति यास सोडून केवळ तार्किक रीत्या सामाजिक सुधारणेचा विचार करणे युक्त आहे असे सिद्ध होत नाही. समाजावर तार्किक हल्ले करणे म्हणजे केवळ पाडापाडीचे काम करणे होय. त्याने समाजाची बंधने शिथिल होतात पण नवी मात्र उत्पन्न होत नाहीत. मिलसारख्या तत्त्ववेत्त्यासहि ही गोष्ट कबूल करावी लागली आहे. आणि काँट या फ्रेंच ग्रंथकाराने जेव्हा निवळ आधिभौतिक पायावर समाजरचना कशी करावी याचे विवेचन केले, तेव्हा त्यास चातुर्वण्यासारखीच एक पद्धत पसंत पडून ती अमलात कशी आणावी याचा त्याने आपल्या ग्रंथात सांगोपांग विचार केला. मिल्लला ही पद्धत पसंत पडली नाही पण अशी पद्धत पाहिजे ही गोष्ट त्याने प्रांजलपणे कबूल केली आहे. व या पद्धतीचे विवेचन केल्याबद्दल त्याने काँटचे अभिनंदन केले आहे. 'केसरी' आणि 'सुधारक' यांचा जो मतभेद होता तो तत्त्वाचा होता. आणि 'तर्कटी' 'माथेफिरू' 'गांवाबाहेरचा' किंवा 'सवंग लोक- प्रियतेच्छु' इ. वाक्शत्रे या वादात मौजेसाठी जरी उपयोगात आलेली असली तरी मुख्य भेद तत्त्वाचा आहे ही गोष्ट खुद्द आगरकरांच्याहि पूर्ण लक्षात आलेली होती. पण सुधारणेचीच ज्यास री ओढावयाची त्यास या गोष्टी कशा कळणार ? आगरकरांचे तर्कचक्र राजकीय सामाजिक शिक्षणविषयक बाबतीत ज्याप्रमाणे एकसारखेच अप्रतिहत चालत होते, तसे त्यांच्या सन्मानार्थ जमलेल्या परवाच्या सभेतील फारच थोड्या लोकांचे चालत असेल, कोणी स्त्रीसुधारणेच्छु तर कोणी प्रार्थना - समाजिस्ट. कोणी विधवाविवाहेच्छु तर कोणी एकेश्वरी. आणि कोणी सर- कारी नोकरीत आयुष्य घालवून थकलेले तर कोणी राष्ट्रीय जेवण करून जातिभेद