पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ सामाजिक व धार्मिक २७ अशी टीका काय म्हणून ? गोखले हे सामाजिक सुधारणेला अनुकूल व तिचे पुरस्कर्ते होते ना ? मग त्यानी सामाजिक सुधारणेवर कितीसे लेख लिहिले व व्याख्याने दिली ? राजकीय सुधारणेच्या. आधी सामाजिक सुधारणा असे जरी प्रत्यक्ष ते तोंडाने म्हणत नसत, तरी ती कल्पना त्याना सर्वस्वी अमान्य नव्हती.. मग राजकीय मतप्रसाराच्या आधी किंवा निदान त्याच्या बरोबर व बरोबरीने सामाजिक सुधारणेविषयी लोकाना उपदेश करण्याला त्यानी आपले वक्तृत्व का खचिले नाही ? फेरोजशहा मेथा यांच्या भाषणांच्या किंवा लेखांच्या ग्रंथात सामा- जिक सुधारणेवर कितीसा भर दिलेला आढळेल ? बरे एक आधी व एक नंतर ही विचारसरणी सोडून देऊनहि निदान सामाजिक व राजकीय सुधारणा, लष्करी शिपायांच्या पायचालीप्रमाणे बरोबरीने व समांतर चालाव्या असे मानले तरी आज जे सामाजिक सुधारणेचे पुढारी व पुरस्कर्ते म्हणून मानले गेले आहेत, त्यानी राजकीय सुधारणेसंबंधाने आपली मते प्रकट करणे व मतप्रसार करणे हे त्यांचेहि कर्तव्य नव्हते काय ? हिंदुस्थानातील राजकारण कसे आहे व कसे असावे या- विषयी चंदावरकर भांडारकर कर्वे याना योग्य कल्पना नव्हत्या, किंवा निदान स्वतःच्या काही कल्पना नव्हत्या, असे कोण म्हणेल ? पण भांडारकरानी पेन्शन घेतल्यावर तरी राजकाणावर कितीशी व्याख्याने दिली व लेख लिहिले १ कर्व्या- नाही राजकीय स्वराज्य हवे आहे. असे असता त्यानी अवघ्या जन्मात राजकारणावर असे एकदा तरी व्याख्यान दिले किंवा एकादा तरी लेख लिहिला असे कोणास दाखवून देता येईल काय ? टिळक वर्तमानपत्रकार असल्यामुळे विविध विषया- वर लिहिण्याचे त्याना सहजच अधिक प्रसंग हे खरे. तथापि कर्व्यांना उलट थोड़े प्रसंग तरी का साधता आले नाहीत ? पण अवध्या जन्मात त्यानी एकच एक विषय पत्करला होता. आणि तो तसा पत्करला होता म्हणूनच, म्हणजे त्यातील कार्य इतर कार्याच्या उपसर्गाने बिघडू नये म्हणूनच, इतर विषय त्यानी टाळले हे कोणीहि सांगेल. त्याच रीतीने टिळकानी जर जाणून बुजून सांगून सवरून राजकारण हा एकच विषय आपलासा केला होता तर त्यानी सामाजिक सुधारणेचे कार्य प्रकट रीतीने किंवा उत्साहाने हाती घेतले नाही याबद्दल त्याना तरी कोणी दोष का द्यावा ! १९१६ साली आगरकरांच्या पुण्यतिथीच्या प्रसंगाने टिळकानी आपल्या- तला व आगरकरातला भेद केसरीत प्रकट केला होता. तसेच हेहि त्यानी प्रगट केले होते की इतर सुधारकांच्या मानाने आगरकर हे राजकारणात जहाल मताचे किंवा खऱ्या राष्ट्रीय बुद्धीचे असता त्यांची पुण्यतिथि करणारे त्यांचे भक्त, केवळ सामाजिक मतांच्या कारणाने आगरकरांचे श्रेष्ठत्व होते असे भासवितात, पण ती खरोखर चूक होय. आगरकरानी आपला तार्किकपणा सामाजिक सुधारणेप्रमाणे राजकीय बाबतीतंहि उपयोगात आणला होता. शिक्षण व राजकीय बाब या दोहोमध्ये आपले व आगरकरांचे मत एकच असता त्यांच्यात व आपल्यात मतभेद का झाला टि. उ...४६