पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ करिता जमविला तो. त्यातहि अहेर एका रकमेने दिलेला घेण्यापलीकडे टिळकांचा काही संबंध आला नाही. या अहेरादाखल जी रक्कम त्याना देण्यात आली ती सर्वबतीत स्वतःचे तुळशीपत्र घालून टिळकानी मुंबईचे श्री. अण्णासाहेब नेने यांचेकडे दिली. सदर रकमेचाहि रीतसर ट्रस्ट करण्यात आला असून ट्रस्टडीड झाले आहे ट्रस्टी नेमण्यात आले आहेत व मधून मधून त्यांचे हिशेब प्रसिद्ध होतात हे केसरीच्या वाचकाना माहीत आहे. चिरोल केस करता जो सुमारे तीन लक्षांचा फंड जमविण्यात आला तो सर्व १९०८ प्रमाणे टिळकांच्याच पश्चात् जमविण्यात आला. या खेपेस तर तो तिकिटांच्या नंबरवारीने दर आठवड्यास प्रसिद्ध होत होता, आणि टिळकांच्या मृत्यूच्या आधी थोडे दिवस तो फंड त्याना जाहीर रीतीने अर्पण करण्याचा समारंभ झाला तेव्हाच त्याचा सर्व हिशेब प्रसिद्ध करण्यात आला होता. राहता राहिला होमरूल लीग किंवा स्वराज्य संघाचा फंड. पण त्याचे हिशेबहि वेळोवेळी पुस्तक रूपाने व वर्तमानपत्राने प्रसिद्ध झालेले आहेत. व या संघाच्या सभासदांची वार्षिक सभा होऊन बहुधा प्रत्येक वर्षी हिशेब सभेपुढे मांडण्यात येत. टिळकांच्या हयातीतला शेवटला हिशेब ता. ३१ मार्च १९२० पर्यंतचा त्या सालच्या मे महिन्यात ता. २३ रोजी भरलेल्या संघाच्या सभेपुढे मांडण्यात आला होता. स्वतः फंडाच्या पैशाच्या व्यवहाराशी टिळकांचा संबंध येत नसे कारण ते नुसते अध्यक्ष होते. खजिनदारांचे काम श्री. अण्णा- साहेब नेने व प्रो. शिवरामपंत परांजपे यांच्याकडे असून हिशेब तपासणीचे काम श्री. गणेश सदाशिव मराठे यांचेकडे असे. ज्या निरनिराळ्या फंडाशी टिळकांचा संबंध आला त्याची हकीकत ही अशी आहे. उपरिनिर्दिष्ट फंडाशिवाय टिळकानी केव्हाही कोणापासूनहि देणग्या किंवा वर्गण्या मागितल्या नाहीत व घेतल्या नाहीत. कोणी एकादा त्यांचा भक्त क्वचित् एकादी रक्कम त्यांच्याकडे त्यांच्या हातून एकाद्या संस्थेला देण्याकरिता पाठवी व त्या हेतूप्रमाणेच तिचा विनियोग टिळक करीत. आणि एकाद्याने उद्देश न सांगता तशीच रक्कम त्यांच्या स्वाधीन केली तर आपल्या पसंतीप्रमाणे एकाद्या सार्वजनिक संस्थेला ते ती देऊन टाकीत. (२) सामाजिक व धार्मिक टिळकांवर प्रतिपक्षांचा आक्षेप व कटाक्ष येऊन जाऊन हा की ते सामा- जिक सुधारणेच्या कार्याला विरोध करीत. या आक्षेपाला टिळकानी रँगलर परां- जपे याना उत्तर देताना उत्तर दिलेच आहे. ते कोणास पटो वा न पटो. परंतु त्यात उल्लेखिलेल्या तत्त्वाचा पगडा टिळकांच्या मनावर बसला होता यात शंका नाही. पण राजकारणात वावरत असता सामाजिक सुधारणेचेहि कार्य टिळकानी त्याच्या बरोबरीने केले नाही हा आक्षेप टिळकावर आणताना त्यांचे टीकाकार ही गोष्ट विसरतात की अशा प्रकारचा आक्षेप इतर कार्यक्षेत्रात इतर अनेक लोकावरहि सहज आणता आला असता. मग एकट्या टिळकावरच