पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक ३५ नऊ आणे याप्रमाणे वसूल लिक्विडेटर याजकडे आला. आणि पुढे मूळ योजने- प्रमाणे छत्रीचे कामहि टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हेतूप्रमाणे पुरे करण्यात आले. तात्पर्य शिवाजी रायगड स्मारक फंडाचा १८९५ सालापासून आज तारखेपर्यंतचा सर्व हिशेब रीतसर मांडलेला व हिशेबनिसानी तपासलेला तयार आहे. व अगदी अलीकडे म्हणजे ता. ३१ मार्च सन १९२६ अखेरच्या हिशेबाचा शेवटला हप्ता समाधीच्या गेल्या समारंभाचे प्रसंगी केसरीतून व इतर रीतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि टिळकांच्या हातून या फंडाचा जमाखर्च काय झाला त्याचा संकलित वृत्तांत ता. ८ जानेवारी १९२४च्या केसरीच्या अंकात संबंध छापला आहे तो कोणासहि पाहता येईल. शिवाजी स्मारकासंबंधाने दुसऱ्या एका संस्थेशी टिळकांचा संबंध आला ती पुण्यातील श्रीशिवाजी मंदिर ही होय. या संस्थेचे ट्रस्ट डीड ता. २५ माहे मे १९१७ रोजी झाले, त्यात ट्रस्ट फंड १५००० चा नमूद असून ट्रस्टी मध्ये लो० टिळक प्रो० हरिभाऊ लिमये व न. चिं. केळकर यांची नेमणूक करण्यात आली होती. नंतर लवकरच टिळक विलायतेला गेले. त्यानंतर शिवाजी मंदिरा- करिता हल्लीची जागा ४ मार्च १९१९ रोजी केळकर यानी ताब्यात घेतली. मंदिर कोठे कसे बांधावे याविषयी टिळकानी मृत्यूपूर्वी समक्ष जागेवर जाऊन सूचना केल्या होत्या. पण मंदिराचे काम २६ एप्रिल १९२२ च्या पूर्वी पुरे झाले नाही. अर्थात् टिळकांचा या संस्थेच्या प्रत्यक्ष पैशाशी काहीच संबंध आला नाही. तथापि या संस्थेचा जमाखर्च केसरी कचेरीच्या द्वारेच बहुतेक करण्यात आला व या संस्थेच्या फंडाचेहि हिशेब वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. टिळकांच्या खटल्यासंबंधाने तीन फंड झाले पैकी पहिला १८९७ साली. त्याची सर्व व्यवस्था परस्पर मुंबईस डॉ. नानासाहेब देशमुख यांच्याकडे होती. टिळकांच्या हाती केव्हाहि नव्हती. तथापि या टिळक डिफेन्स फंडाचा हिशेब केसरी व टाइम्स ऑफ इंडिया यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. शिवाय आमच्या टिळक चरित्र ग्रंथाच्या पूर्वार्धात २५ व्या भागाचे परिशिष्ट ३ म्हणजे पृष्ठ ५९८ यावर या फंडाची हकीकत दिलेलीच आहे ती वाचकाना पाहता येईल. खटल्यासंबंधी दुसरा फंड १९०८ साली खासगी रीतीने काढण्यात आला. परंतु त्याची परिस्थिति काय होती व त्याचे हिशेब का प्रसिद्ध झाले नाहीत याचे कारण प्रस्तुत चरित्रग्रंथाचा उत्तरार्ध खंड १ भाग ८ पृष्ठ ६६ या ठिकाणी आम्ही दिले आहे. पण हा फंड जमविणे व खर्च करणे या सर्व गोष्टी टिळकांच्या पश्चातच झालेल्या असल्यामुळे त्यांचा त्याच्याशी काहीच संबंध आलेला नव्हता यामुळे त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी नव्हती. १९१६ साली टिळकावर राज- द्रोहाचा तिसरा खटला झाला. परंतु त्या वेळचा सर्व खर्च स्वतः टिळकांच्या खाजगीतून म्हणजे केसरी कचेरीच्या शिलकेतून झाला. इतर फंडापैकी पहिला फंड १९९६ साली टिळकांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्याना अहेर करण्या-