पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ लो० टिळकांचे चरित्र भोग ९ आलीच असेल, त्यांच्या पश्चात् १९१२ साली केसरीला एकदम पाच हजारांची जामीनकी प्रेस अॅक्टामुळे भरावी लागली त्यावेळी प्रथम कर्जच काढावे लागले. १९९२ पासून १९१६ पर्यंत चार वर्षे विशेष खर्च नाही अशा स्थितीत गेली. व कर्जफेडीकरिताच ही काटकसर टिळकांच्या सांगण्यावरून केली होती हेहि त्यांच्या मंडाले येथील एका पत्रावरून दिसून येईल. या कर्जफेडीनंतर केसरीच्या उत्पन्नातून घरखर्च जाऊन शिल्लक उरू लागली. पण १९१६ सालापूर्वीच चिरोल साहेबांवर विलायतेत फिर्याद लावून नव्या खर्चाला एक भले मोठे तोंड टिळकानी पाडून ठेवले होते. आणि येथपासून पुढे विलायतच्या या खर्चाकरिता होईल तितकी रकम एका बाजूला काढून ठेवणे हे टिळकांच्या फडणविसाचे काम होऊन बसले होते. अखेर चिरोल प्रकरणी अपयश आल्यामुळे ही बाजूला काढून ठेवलेली रकम तर कोठल्या कोठेच गेली, पण टिळकांच्या स्नेह्यानी व अनु- यायानी चिरोल फंड उभारला नसता तर टिळक मरणाच्या वेळी कजीत आकंठ बुडून राहिले असते व त्यांच्या केसरी मराठा संस्थेलाहि दहाबारा वर्षे तरी कर्जाची व्याजे भरणे व मुद्दलफेड करणे याशिवाय दुसरे काही एक करिता आले नसते. टिळकानी कोलंबो येथे मृत्युपत्र केले ते कोणी वाचील तर त्यावेळी टिळकांची सांपत्तिक स्थिति कशी होती हे तेव्हाच लक्षात येईल. टिळक म्हटले म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांचे फंडहि काही लोक पुढे आण- तात. पण टिळकांचा आजवर किती फंडाशी संबंध आला व त्यांचा काय कसा उपयोग झाला या सर्व गोष्टी वेळोवेळी स्वतः त्यांच्या व इतर पत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. १८९५ साली त्यांच्या प्रयत्नाने रायगड येथील शिवाजी स्मारकफंड सुरू झाला. त्याचे काम टिळकांच्याकडे अखेरपर्यंत होते. या मुदतीत त्यानी त्याचे दिशेच वेळोवेळी पैन् पै प्रसिद्ध केले आहेत. सन १८९९ साली ता. १८ जुलै रोजी या हिशेबाचा पहिला हप्ता त्यानी प्रसिद्ध केला या वेळी फंडाची शिलकी रक्कम १९८५४ रु. ७ आ. ५॥पै इतकी होती. यानंतर सन १९०६ साली ता. २० एप्रिल रोजी दरम्यानचा हिशेब त्यानी प्रसिद्ध केला. त्यावेळी शिल्लक २४७५३रु. १आ. ०पै इतकी होती. १९०८ साली टिळक तुरुंगात गेले व ते परत आल्या- नंतर डेक्कन बँकेचे दिवाळे निघाले व त्यात शिवाजी स्मारक फंड गुंतला गेला. व बँकेचे लिक्विडेशनचे काम टिळकांच्या मृत्यूपूर्वी सर्व पुरे झाले नाही. यामुळे प्रत्यक्ष पैसे हातात किती येतात हे समजण्याला मार्ग नव्हता. शिवाय १९१४ नंतर राय- गडावर जाऊन त्यानी उत्सवहि केला नाही. हा एक प्रसंग हिशेब प्रसिद्ध कर- ण्याचा असतो. पण वरील दोन कारणामुळे १९०६ सालानंतर टिळकाना या फंडाचा हिशोब प्रसिद्ध करता आला नाही तथापि डेकन बँकेकडे टिळकानी ठेवलेली रक्कम व त्यावर चढलेले व्याज मिळून एकंदर ३६३७०रु. ५ आ. २ पै. येवढ्या रकमेचा क्लेम टिळकाकडून बँकेच्या लिक्विडेटरकडे आधी दिवाणी हुकूम- नामा मिळवून दाखल करण्यात आला होता. टिळकांच्या मृत्यूनंतर रुपयात