पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ९ व्यक्तिविषयक २३ करिता कोणी देवळाच्या जीर्णोद्धाराकरिता कोणी नवीन धंदा सुरू करण्याकरिता, तात्पर्य कोणी कशाकरिता तर कोणी कशाकरिता म्हणून टिळकाकडे पैशाची मागणी करीत. त्यांच्या आयुष्यातील या मागण्याची बेरीज केली असता १०-२० लाख रुपये तरी सहज भरेल असे वाटते. अर्थात् बहुतेक सर्वांना नकार देणे टिळकाना प्राप्तच होई. मात्र ते अशा लोकाना लेखी उत्तरे देण्याच्या भानगडीत फारसे पडत नसत. असली पत्रे वाचून सहसा फाडून टाकीत. किंवा शेजारी कोणी स्नेही सोबती बसला असला तर मौजेने त्याला ती दाखवीत. पण याचक सम- क्षच आला म्हणजे त्याला विन्मुख परत पाठविण्याकरिता त्याना पाच चार मिनिटे तरी लागत व परोपरीने त्याचे समाधान करावे लागे. पूर्वी टिळकांजवळ पैसे असल्याचा बोभाटा तरी नव्हता. पण पुढे पुढे त्यांच्या नांवचे काही फंड गोळा झाल्यावर टिळकांच्या संपत्तिविषयींच्या काही लोकांच्या कल्पना काही अद्भुतच होऊन बसल्या. शिवाय आजपर्यंत टिळक नाही म्हणाले तरी ते रागा- वत तरी नसत. पण आता त्याना वाटे की एवढे मोठे फंड जमले असूनहि आमची यःकश्चित मागणी टिळक मान्य करीत नाहीत ते काय म्हणून ? पण त्याना हे कळेना की अशा प्रत्येक फंडाचा हेतु व कार्य आधी निश्चित होऊन त्या- करिता फंड जमविण्यात आला होता. आधी खर्चाचे कार्य निश्चित न होता फंड जमविला गेला असा त्यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या एक लक्ष रुपयांचा. पण त्याचाहि हेतु सार्वजनिक कार्याकडे खर्चणे हाच होता. करोहि असो. याचकांची दृष्टि एवढी मोठी की 'मला दिले तर ते जगाला दिले' असेहि बहुधा त्याना वाटे ! स्वतः टिळकांच्या संपत्तिमत्तेसंबधाने पाहिले तर असेच म्हणावे लागेल की ती प्रथम वाईट होती. पुढे हळूहळू सुधारली. पण त्या सुधारणेबरोबर त्यांच्या खचीची तोंडे वाढली. १८९१ साली त्यानी केसरी मराठा विकत घेतला तो साडे सात हजार रुपयांचे कर्ज करून. हे कर्ज फिटण्यापूर्वीच १८९७ चा खटला उप- स्थित झाला. या खटल्याकरिता फंड उभारण्यात आला तरी खासगी असा खर्च काही करावाच लागला. पुढे दोन वर्षे लॉक्लास बंद राहिल्याने कुटुंबचरितार्थांचे ते साधन नाहीसे झाले. यामुळे जमाखर्चाची तोंडे कशी तरी मिळविण्यापलीकडे काही करिता आले नाही. १९०१ सालापासून केसरीचे उत्पन्न थोडे वाढू लागले पण त्या वर्षापासून ताईमहाराज प्रकरण उपस्थित झाले व पुढील तीन सालांत त्याना या कामी पंधरावीस हजार रुपये पदरचे खर्चावे लागले. १९०४ साला- पासून १९०७ पर्यंत बरे दिवस गेले तोंच सुरतेची राष्ट्रीय सभा आली. आणि या व पुढील सालांत त्यांचा सार्वजनिक खर्च सहा सात हजार रुपये झाला. पुढचे साली फिरून नवा खटला उपस्थित झाला. आणि टिळक कर्जाचा बोजा अंगावर घेऊनच तुरुंगात गेले ! तुरुंगात मृत्युपत्र लिहिताना कर्जाची व्यवस्था करणे हे त्यात एक मुख्य कलम होते. आणि मंडाले येथे असताना टिळक निष्कर्जी नव्हते ही गोष्ट याच ग्रंथात पूर्वी दिलेली मंडाले येथील पत्रे वाचणाराच्या ध्यानात