पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ घातली. मंडळी म्हणाली याचा बहुधा पाय मोडला असेल. पण ते लोक जिन्या- कडे जातात तोच टिळक आपल्या पायानी वर चढून येत होते. " द्रव्य - व्यवहार - याच्या बाबतीत टिळक इतके निर्लेप निःस्पृह होते की, त्यांच्या हाती असलेल्या मोठमोठ्या फंडांचे वैषम्य वाटून शत्रूनी काही टीका केली पण, त्यानी कोणाच्या पैशाचा कधी अपहार राहोच पण दुरुपयोग केल्याचे कोणालाहि माहित नाही. उलट त्यानी स्वतः झीज सोसून लोकाना मदत केल्याचे सांगणा- रेच पुष्कळ भेटतील. त्यांचे नातू ग. वि. केतकर हे आपल्या एका आठवणीत लिहितात की, " कोणी त्याना हे व्या पैसे म्हणून आणून दिल्यास स्वतः ते न घेता एखाद्या सार्वजनिक फंडाचे नाव घेऊन तिकडे द्या म्हणून सांगत. काही लोक कोठेहि दूर प्रवासाला जावयाचे झाल्यास विश्वासाने आपल्या पैशाची थैली टिळकाकडे आणून देत ही ऐकीव गोष्ट नाही. एकाने आणून दिलेली चौदाशे रुपयांची थैली मी मोजून बांधून दिली आहे. " उलट जो कोणी टिळकाकडे येऊन द्रव्यसहाय्य मांगेल त्याला टिळक ते यथाशक्ति देत असत. त्यांच्याकडे पैशाच्या मागण्या किती याव्या याचा काही नेमच नव्हता. अर्थात् अशा सर्व मागण्या पुरविण्याइतके द्रव्यसहाय त्यांच्या जवळ नव्हतेच, पण त्या पुरविण्याला कोणाहि परोपकारी लक्षाधीशाची संपत्ति पुरी पडली नसती. टिळक परोपकारी असले तरी कोणाला काही सल्ला देतील, कोणाचे काही ऐकून सहानुभूति व्यक्त करतील, कोणाचे लिहिलेले काही वाचतील, कोणाला आधार काढून देतील, कोणाचा एखादा अर्ज लिहून देतील, कोणाला एखादे शिफारस पत्र लिहून देतील, कोणाशी तात्त्विक चर्चा करतील, कोणाला काही विषय समजला नसला तर समजून देतील. या गोष्टी वेळ असेल त्याप्रमाणे कंटाळा न करिताहि ते करीत. पण पैशाचे सोंग टिळक झाले तरी कसे उभे करणार ? बरे लोकाना तरी हा विचार कोठे असतो ? एक गृहस्थ असे म्हणताना आम्ही ऐकले आहे की, “टिळक एवढे देशभक्त म्हणवितात मग आपल्या वर्तमानपत्राला वर्गणी का घेतात १ जाहीर- रातीना पैसे का घेतात ? खऱ्या देशभक्ताने वर्गणीकरिता किंवा जाहीरातीकरिता पैसे घेऊ नये ! " पण असे म्हणणारे लोकहि वेळ पडली असता मला अमुक मदत द्या अमक्याला अमुक मदत द्या असे म्हणावयाला तयारच असत. त्यांची विचारसरणी अशी की, “टिळकांच्या जवळ जर पैशाचे मोजमाप आहे व त्यांच्या संग्रहाला मर्यादा आहे तर त्यांच्या आमच्यामध्ये फरक तो काय ? आम्ही त्याना देवासारखे मानतो ते फुकटच समजावयाचे !” हे बोलणाराला आपण काय बोलतो हे कळत नव्हते असेहि नाही. पण असा वितंडवाद करणारे लोकहि आढळतात. त्याना एक गोष्ट कळे की आपणाला हवे ते थेट जाऊन टिळकाजवळ मागावे. कोणी कर्ज फेडीकरिता कोणी शेतीकरिता कोणी काशीयात्रेकरिता कोणी मुलाच्या शिक्षणाकरिता कोणी मुलाच्या लग्नाकरिता कोणी औषधोपचारा-