पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक २१ यासंबंधाने त्यानी दाखविलेल्या धैर्याची माहिती पुष्कळाना आहे म्हणून त्याचा विशेष उल्लेख करण्याचे कारण नाही. याचे खरे प्रत्यंतर म्हटले म्हणजे फौजदारी खटल्याचे काम चालू असता आणि त्याचा निकाल होण्याची वेळ आली असता त्याना विनोद सुचे हे होय. क्लेमंट साहेबा- पुढील निकालाचे दिवशी गाडीत बसून निघाले असता ते बरोबरीच्या मंडळीना म्हणाले " जाताना आपण चौघे जाणार व परत येताना तुम्ही तिघे येणार. तेव्हा ' त्रयाणां धूर्तानां' हे शब्द लोक तुम्हाला लावतील संभाळा ! " एक मोठा वकील देण्याच्या ऐवजी दोन मध्यम वकील देण्याच्या मुद्यावर 'वीस वर्षाच्या नवऱ्याऐवजी दहा दहा वर्षांचे दोन नवरे करून देण्याची कल्पना' मांडून त्यानी सूचना करणारांची थट्टा कशी केली हे पुष्कळाना माहीत आहे. आणि दुसऱ्या खटल्याच्या शेवटच्या दिवशी काही तरी भयंकर शिक्षा होणार असे लोकाना वाटून जवळच्या काही मंडळीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले तेव्हा ते म्हणाले " तुम्ही लोक माझ्यापुढे बसून रडणार असला तर निघून जा कसे ! " या खटल्याच्या अखेर शिक्षा सांगताना जजानी जे गंभीर व भयंकर शब्द उच्चारले ते बुडवून त्यांचे तेज लोपवून टाकण्यासारखे शब्द अखेरीस उच्चारून टिळ- कानी स्वतःला करिता येईल तितका न्यायाधीशाचा पाणउतारा केला ही गोष्ट जगजाहीर आहे. अखेर अखेर ब्राह्मणेतर चळवळीत कोणी त्यांची अप्रतिष्ठा करील किंवा त्यांच्या अंगावर हात टाकील असाहि संभव होता. विलायतेहून ते परत आल्यावर मानपत्राच्या सभेत दंगा होणार अशी बोलवा होती. त्याचा थोडासा बंदोबस्त स्वयंसेवक मंडळीने केला होता ही गोष्ट खरी. तथापि दुरून कोणी शेणमाती फेकणार नाही कशावरून ? तेव्हा भुस्कुटे यांच्या आठवणीप्रमाणे टिळक मित्रमंडळीवर रागावून म्हणाले “ मंडईत जाऊन मी उभा राहतो. कोण माझ्या अंगावर शेण फेकतो हेच मला पाहावयाचे आहे ! शारीरिक धैर्याची एक गोष्ट सोमण यानी लिहिली ती अशी की, रायगडावर तळ्यात मंडळी पोह- ण्याला उतरली तेव्हा एकजण म्हणाला 'एकदम तळ्यात उडी कशी टाकावी? दगड- बिगड लागावयाचा.' तेव्हा टिळक म्हणाले ' या तळ्यातील दगड काढूनच ज्या अर्थी एवढे मोठे वाडे गडावर उठविले आहेत त्याअर्थी खाली दगड लागण्याची भीति कसली?' असे म्हणून त्यानी पहिली उडी टाकली. आणि त्याच प्रका- रची गोष्ट कृष्णाजीपंत देवल यानी सांगितली आहे ती अशी की 'डेक्कन काले- जात एकदा वरच्या मजल्यावर मंडळी जमून गप्पा गोष्टी निघाल्या. त्यात शारी- रिक पराक्रमाच्याहि निघाल्या. मंडळीना आवेश चढला. एक म्हणाला " यावेळी येथून एकाएकी नाहीसे होण्याचा प्रसंग आला तर काय कराल ? जो तो म्हणू लागला हे शक्यच नाही. इतक्यात टिळकानी काचा मारून एका क्षणाचाहि विचार न करिता मी हे असे करीन असे म्हणत दुमजल्यावरून खाली उड़ी